भारतात केळीचं उत्पादन जगातील इतर देशांच्या तुलनेने अधिक होते. आपल्या देशात केळींचे उत्पादन २.७५ कोटी टन होत असून केळी उत्पादनात भारत पहिल्या स्थानी आहे. केळी उत्पादनात भारतानंतर चीनचा नंबर असून चीनमध्ये १.२ कोटी टनाचे उत्पादन होते. भारतात केळींना खूप मागणी असल्याने निर्यात कमी असते.
केळींची निर्यात सर्वात जास्त फिलिपिन्स देश करत असते. भारतातील केळी उत्पादक निर्यात का करू शकत नाही यासाठी दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे, केळी उत्पादक चांगल्या प्रकारची वाणांची लागवड करत नाहीत. आणि शास्त्रीय पद्धतीने केळीची शेती केली जात नाही. यामुळे निर्यातीसारखा माल उत्पादित होत नाही.
शास्त्रीय पद्धतीची शेती ही फक्त उत्पन्नचं नाही वाढवत तर शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढवते. केळी उत्पादकांची ही गोष्टीची दखल घेत भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR) आणि राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राद्वारे देशातील केळी उत्पादकांसाठी एक मोबाईल अॅप तयार केले आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केळींविषयीची सर्व माहिती मिळणार आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एडवान्स कॅम्प्युटरिंग, हैदराबादद्वारे बनावण्यात आलेल्या माबाईल अॅपचं नाव “बनाना प्रोडक्शन टेक्नोलांजी (केला–उत्पादन प्रोद्धोगिकी)” "केळी उत्पादन तंत्रज्ञान" आहे. केळी उत्पादकांना लक्षात घेऊन हा मोबाईल अॅप बनविण्यात आला आहे. हा अॅप सध्या तीन भाषेत हिंदी, इंग्रजी, तमीळ या भाषेत उपलब्ध आहे, केळी लागवडीशिवाय इतर प्रकारच्या माहिती केळी उत्पादकांनाही उपलब्ध
करुन देण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकरी हवामान, माती, रोप लागवड सामग्री, लागवड, पाणी व्यवस्थापन, पोषक व्यवस्थापन, खत समायोजन समीकरण यासंबंधी माहिती दिली जात आहे. याशिवाय फळांचे पिकविणे व फळांच्या घडांची माहिती कोणाला दिली जाईल.
दरम्यान बनाना प्रोडक्शन टेक्नोलॉजी (केला – उत्पादन प्रोद्धोगिकी) को गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येणार आहे.
Share your comments