राजस्थानमधील बारन जिल्ह्यात राहणारा एका शेतकरी कुटुंबातील जन्मलेल्या योगेश नागर या तरुणाने वडिलांना होणारा त्रास कमी व्हावा या जिद्दीतून चक्क रिमोटवर चालणारा ट्रॅक्टर तयार केला आहे. विशेष म्हणजे ट्रॅक्टर रिमोटच्या मदतीने शेती नांगरणे पासून अनेक प्रकारची शेतीचे काम करतो. सन 2017 साली वयाच्या 19 व्या बारावी पास झाल्यानंतर झाल्यानंतर योगेशने बीएससीसाठी प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर योगेशने रिमोट कंट्रोल ट्रॅक्टर तयार केला. योगेशचे वडील रामबाबू नागर हे शेतकरी आहेत. त्यांना ट्रॅक्टर चालवित असताना पोटात दुखण्याचा त्रास व्हायचा. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ट्रॅक्टर न चालवण्याचा सल्ला दिलेला होता. वडिलांना होणारा त्रास पाहून योगेशने शेतात दोन महिने ट्रॅक्टर चालविला.
मात्र चालक नसताना ट्रॅक्टर शेतात काम करू शकतो, अशी कल्पना दोन महिने ट्रॅक्टर चालविल्यानंतर योगेशला सुचली. आता हा रिमोट कंट्रोल ट्रॅक्टर रिमोटच्या मदतीने शेताची अनेक कामे करतो. विशेष म्हणजे हा रिमोट अगदी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ट्रॅक्टरवर नियंत्रण ठेवू शकतो. महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरचा पुढील भागात लावण्यात आलेल्या सेंसोर्समुळे ट्रॅक्टर समोर कोणी आल्यास ट्रॅक्टरला ब्रेक लागतो.
स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतले ५० हजार रुपयांचे कर्ज
योगेश ड्रायव्हर लेस ट्रॅक्टरचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या वडिलांकडून आणि काही आप्तेष्ट मंडळीकडून एकूण ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर या पैशांमधून लागणारे एसेसरीज विकत आणून दोन महिन्यांच्या अथक संशोधनानंतर आणि प्रयत्नांनी एक मोठा रिमोट कंट्रोल तयार केला तिच्या मदतीने थेट ट्रॅक्टर चालवता येतो. योगेश हा प्रयोग पाहून त्यांचे वडील रामबाबू यांचा विश्वासच बसत नव्हता. परंतु पुढे चालू तयार केलेल्या सॅम्पलच्या मदतीने योगेश मी रिमोट कंट्रोल च्या सहाय्याने ट्रॅक्टर मागेपुढे करून दाखवल्यानंतर योगेशचे वडील यांना विश्वास बसला.योगेशने बनवलेला हा रिमोट कंट्रोल ट्रॅक्टरमधील ट्रान्समीटरशी कनेक्ट होतो. अशाप्रकारे ट्रॅक्टर चालणारे रिमोट कंट्रोल बनवून देऊन तसा बदल आपल्या ट्रॅक्टरमध्ये करून घेण्यासाठी एक दोन नाही तर तब्बल साठ जणांनी योगेश कुठे संपर्क केला आहे.
Share your comments