सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक योजना राबविण्यात येत असतात. यामध्ये शेतकऱ्यांना फायदा व्हावा हा उद्देश या मागचा असतो. काही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा यासाठी जनजागृतीदेखील केली जात आहे.
आता सांगली जिल्ह्यात शासकीय अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात या वर्षात ४ हजार २०४ शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा लाभ घेतला आहे.
शेतकऱ्यांना २९ कोटी ६७ लाखांचे अनुदान अदा झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. केंद्राकडून यामध्ये यांत्रिक शेतीसाठी ट्रॅक्टर आणि मशागत साहित्यावर अनुदान दिले जाते.
कृषी जागरणचे राष्ट्रीय व्यासपीठ देशातील शेतकऱ्यांचा करणार सन्मान..
त्यात लॉटरी पद्धतीने लाभार्थी ठरवले जातात. गेल्या पाच वर्षात ट्रॅक्टर, पॉवर टिलरसाठीची मागणी दुपटीहून अधिक वाढली आहे. यामुळे अनेकजण याचा लाभ घेत आहेत. या योजनेतून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ब्लोअर, पेरणीयंत्र, नांगर ही यंत्रे मिळत आहेत.
शेतकरीच नवरा पाहिजे! उच्चशिक्षित नोकरी करणाऱ्या तरूणीचा हट्ट, वडिलांनी अखेर तिची इच्छा केली पूर्ण..
यंदाही शेतकऱ्यांनी योजनेत समाविष्ट होण्यासाठी अर्ज दाखल केले असून शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. असेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
टोमॅटोसाठी दुकानदाराने तैनात केले बाउन्सर, सांगितले धक्कादायक कारण
टोमॅटो ६० रुपये किलोने मिळणार! सरकारने सुरु केली योजना, जाणून घ्या..
Share your comments