1. शिक्षण

बातम्या आनंदाची! कृषी खात्याकडून लवकरच भरली जाणार रिक्त पदे, शासनाकडून निर्बंध शिथिल

कोरोना महामारी आल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आले होते. या कोरोना पार्श्वभूमीवर शासकीय नोकर भरतीवर राज्य शासनाने काही प्रमाणामध्ये निर्बंध लावलेले होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
vacancy fill up in agriculture department

vacancy fill up in agriculture department

 कोरोना महामारी आल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आले होते. या कोरोना पार्श्वभूमीवर शासकीय नोकर भरतीवर राज्य शासनाने काही प्रमाणामध्ये निर्बंध लावलेले होते.

त्यामुळे सर्वच प्रकारच्या शासकीय भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या होत्या. परंतु आता शासनाने लावलेले हे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे आता शासकीय विभागातील काही रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याला कृषी विभाग देखील अपवाद नाही. आता कृषी विभागातील देखील काही रिक्त पदे भरली जाणार आहेत.

नक्की वाचा:Agriculture News : एप्रिलच्या शेवटाला करा 'या' पिकांची लागवड आणि कमवा भरपूर पैसा; वाचा याविषयी

कोविड संकटामुळे राज्य शासनाचे महसूल उत्पादनात प्रचंड घट आलेली होती व त्यामुळे शासनाने तिजोरीवर आलेला ताण बघता 4 मे 2020 पासून काही आर्थिक उपाय योजना लागू केले होते. तेव्हा हे निर्बंध लागू करण्यात आले होते त्यावेळी उच्चस्तरीय सचिव समितीने तसेच उपसमितीने मान्यता दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षातील रिक्त पदे आता पूर्णतः भरता येतील असे राज्याच्या अर्थखात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कृषी विभागात आता काही रिक्त पदे भरण्याबाबत हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.

 2016 मध्ये अर्थ खात्याने दिलेल्या सूचनांप्रमाणे सुधारित आकृतिबंध मंजूर केलेल्या प्रशासकीय विभागाने राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे 100% भरावीत असे शासनाने म्हटले आहे. त्यामुळे आता कृषी विभाग आता कोणत्या प्रकारचे रिक्त पदे भरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पदभरती करण्यास शासनाने मान्यता दिली असली तरी सुधारित आकृतीबंध अंतिम रित्या मंजूर असल्यास त्यातील राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षातील पद वगळताअन्य पदे भरण्यास केवळ 50 टक्के भरता येणार आहे. मात्र या नियमामुळे भरतीसाठी अजिबात संधी नसल्यास किमान एक  पद भरता येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

नक्की वाचा:Farming Business Idea: फक्त 'या' चार पिकांची लागवड करा आणि कमवा बक्कळ पैसा; वाचा याविषयी सविस्तर

 कृषी विभागाने या बाबतीत सुधारित आकृतिबंध अद्याप जाहीर केलेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

पूर्वी असलेल्या रचनेनुसार कृषी खात्यात एकूण 28 हजार 426 पदे होती.त्याची 861 पदे प्रतिनियुक्ती चे होती. नव्या आकृतीबंधात 1423 पदे रद्द करण्याच्या हालचाली झालेल्या होत्या. मात्र कृषी सहायकांच्या पदांना प्राधान्य दिले जाणार असून किमान दोन हजार पदे वाढविण्याचा विचार सुरू आहे. याशिवाय पर्यवेक्षकांची 274 तर विविध संवर्गातील कृषी अधिकाऱ्यांची 400 पेक्षा जास्त पदे नव्याने तयार करणार आहे.( संदर्भ स्त्रोत- ॲग्रोवन)

English Summary: vacancy fill up in agriculture department immediaetly maharashtra goverment Published on: 18 April 2022, 10:07 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters