आपल्याला माहित आहेच कि बरेच जण ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करतात. अनेक प्रकारचे तरुण लाखोच्या संख्येमध्ये ऑनलाईन पदवी आणि डिस्टन्स लर्निंग पदवीसाठी प्रवेश घेतात व अशा पद्धतीने पदवी मिळवता. कारण बऱ्याच जणांना रेगुलर कॉलेज करणे शक्य नसते त्यामुळे बरेच जण आपला रोजगार सांभाळून विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात.
अशा प्रकारच्या पदवी मिळवणारे व्यक्तीसाठी एक आनंदाची बातमी समोर येत असून आता मान्यताप्राप्त एखाद्या शैक्षणिक संस्थेकडून मिळवलेली डिस्टन्स लर्निंग डिग्री आणि ऑनलाइन अभ्यासक्रमाची डिग्री सुद्धा रेग्युलर डिग्रीच्या बरोबरीनेच मानले जाईल अशी घोषणा विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने केली आहे.
नक्की वाचा:Bussiness For Women: 2 लाख रुपये गुंतवणूक करून घरी सुरू करा 'हा'उद्योग,मिळेल लाखात नफा
याबाबतची माहिती देताना यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी सांगितले की, 2014 मधील यूजीसीच्या अधिसूचनेनुसार ज्या पद्धतीने विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून पारंपारिक पद्धतीने बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली जाते अगदी त्याचप्रमाणे डिस्टन्स लर्निंगशी संबंधित विद्यापीठाने मान्यता दिली जाईल.
एवढेच नाही तर उच्च शिक्षण संस्थांच्या ऑनलाइन अभ्यासक्रमांना देखील इतकेच महत्व दिले जाणार आहे. पण एकंदरीत भारतीय विद्यार्थ्यांचा विचार केला तर जवळजवळ पंचवीस टक्के विद्यार्थी ऑनलाइन डिस्टन्स लर्निंग अभ्यासक्रमांमध्ये नोंदणीकृत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
Education News: संपूर्ण देशात बोर्डाच्या परीक्षामध्ये येणार समानता,काय आहे सरकारचा प्लॅन?
Share your comments