1. शिक्षण

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होणार ऑनलाईन, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्व्भूमीवर निर्णय

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्व्भूमीवर शाळा व महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या सूचना विद्यापीठांना केले आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
pune university

pune university

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शाळा व महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या सूचना विद्यापीठांना केले आहेत.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आनंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ने सुद्धा फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतीतमार्गदर्शक तत्वे व सूचना प्रसिद्ध केल्या असून प्रथम सत्रातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी पद्धतीने होणार आहेत.

 या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2021 -22 च्या प्रथम सत्रातील नियमित व अनुशासित तसेच बहिस्थश्रेणीसुद्धा बी ए टू बी ए, बीएससी टू बीएससी इत्यादींसाठी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन टप्प्याटप्प्याने फेब्रुवारी आणि मार्च 2022 पासून फक्त ऑनलाईन करण्यात आले आहे.

 असेल राहील परीक्षेचे स्वरूप

परीक्षे साठी साठ बहुपर्यायी प्रश्न असतील. त्यामधून 50 प्रश्‍नांची अचूक उत्तरे ग्राहय धरण्यात येतील. विज्ञान व अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील गणित व संख्याशास्त्र विषयांसाठी 30 प्रश्न विचारले जातील व त्यामधील 25 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरले जातील. 

या घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास उर्वरित वेळ विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर मार्फत आपोआप वाढवून देण्यात येईल.  यापूर्वी दिलेली उत्तरेही आपोआप सेव्ह होऊन परीक्षा पुन्हा राहिलेल्या वेळासाठी सुरू होईल.

English Summary: total exam of savitribai phule pune university get online Published on: 14 January 2022, 07:34 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters