अकरावी प्रवेशाच्या आज विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीची प्रतीक्षा आज संपणार असून प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची अंतिम गुणवत्ता यादी शुक्रवार दिनांक 27 रोजी जाहीर होणार आहे.
दहावीच्या निकालानंतर असंख्य विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची प्रतीक्षा लागली होती.मिरीट लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकालाचा आकडा वाढला आहे त्यामुळे शहरातील प्रसिद्ध महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशाचा कट ऑफ देखील वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी ची पहिली गुणवत्ता यादी फार महत्त्वाची आहे. या प्रवेश प्रक्रिया अंतर्गत 311 कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल एक लाख सात हजार 892 रिक्त जागांसाठी आतापर्यंत 79 हजार 328 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे.
विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालय अलॉट झाल्यानंतर प्रवेशावेळी उर्वरित कागदपत्रे अपलोड करण्याची संधी उपलब्ध असेल. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी साधारणतः 21 दिवसांचा कालावधी लागत आहे.
त्यामुळे सदर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच बाकीचे उपलब्ध कागदपत्रे अलॉटमेंट वेळी अपलोड करावीत. एनसीएल प्रमाणपत्र नसल्यास ते मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पोच अपलोड करावी. त्यानंतर 30 दिवसाच्या आत हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होतील असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
Share your comments