विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे याच्यामध्ये शासनाचा उद्देश असतो की, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण करण्यात अडचण येऊ नये तसेच त्यांना त्यांच्या क्षेत्रात शिक्षण घेऊन प्रगती करता यावी हा होय. शासनाकडून निरनिराळ्या घटकातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप देऊ केल्या जातात. परंतु बऱ्याचदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती बद्दल पुरेशी माहिती नसते.त्यामुळे या लेखात आपण अशाच काही विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असलेल्या शिष्यवृत्ती बद्दल माहिती घेऊ.
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शिष्यवृत्ती
- नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम- नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग द्वारे ही परीक्षा आयोजित केली जाते. यासाठी कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता दहावीत शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- इयत्ता दहावीत शिकणारे विद्यार्थी यासाठी पात्र असतात.
- ही परीक्षा राज्यस्तरीय आणि ऑल इंडिया स्तरावर होते.
- याद्वारे मिळालेल्या स्कॉलरशिप नुसार प्रतिमहिना विद्यार्थ्याला बाराशे पन्नास रुपये मिळतात.
- यासाठी कर्जाचा कालावधी हा ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत असतो.
- यासाठी अर्ज करताना तो संबंधित राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाच्या लायझन ऑफिसर च्या माध्यमातून करावा लागतो.
2- सीबीएससी सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप- या स्कॉलरशिप चा महत्त्वाचा उद्देश म्हणजे जे पालक आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. अशा पालकांना प्रोत्साहन देणे हा या स्कॉलरशिपचा उद्देश आहे. ही स्कॉलरशिप गुणवत्तेवर आधारित असून ती अशा विद्यार्थिनींसाठी आहे ज्या सिंगल गर्ल चाइल्ड आहेत. अशा मुलीच्या सीबीएससी च्या माध्यमातून इयत्ता अकरावी याचा बारावीमध्ये शिकत आहेत आणि ज्या मुलींची शैक्षणिक ट्यूशन फी एका वर्षात प्रत्येक महिन्याला पंधरा पेक्षा अधिक नाही. अशा विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
या स्कॉलरशिप ची महत्त्वाची वैशिष्ट्ये
- या स्कॉलरशिपसाठी सीबीएससी बोर्डमध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये साठ टक्के गुण आवश्यक असतात.
- स्कॉलरशिप इयत्ता अकरावी आणि बारावी साठी प्रतिमहिना पाचशे रुपये असे दोन वर्षापर्यंत दिले जातात.
- अर्ज करण्याचा कालावधी हा सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत असतो.
अल्पसंख्याकांसाठी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप…
ही स्कॉलरशिप भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालय द्वारे आयोजित केली जाते. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देणे तसेच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या स्कॉलरशिप चा उद्देश आहे. मागील वर्षीचे इयत्तेच्या वार्षिक परीक्षेत कमीत कमी 50 टक्के गुण असणे या स्कॉलरशिपसाठी आवश्यक आहे. तसेच संबंधित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे एक लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
या स्कॉलरशिप चे वैशिष्ट्ये
- या स्कॉलरशिप साठी फक्त अल्पसंख्यांक विद्यार्थी पात्र असतात.
- स्कॉलरशिप ऍडमिशन फी, ट्युशन फी, मेंटेनन्स अलाउंस या स्वरूपात दिली जाते.
- या स्कॉलरशिपसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारे अर्ज करू शकता.
प्री मॅट्रिक स्कॉलरशिप
स्कॉलरशिप प्रामुख्याने इयत्ता नववी आणि दहावी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत म्हणून दिली जाते. या स्कॉलरशिप ची महत्त्वाची अट अशी आहे की जे विद्यार्थी चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांग आहेत,अशा विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप चा फायदा होतो. जे विद्यार्थी या स्कॉलरशिपचा लाभ घेतील अशा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या स्कॉलरशिपसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना मेंटेनन्स अलाउंस,डिझ्याबिलिटी अलाउन्स आणि बुक ग्रांटमिळते.
नेशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम
ही योजना प्रामुख्याने आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या हुशार विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते.विद्यार्थी नववी मध्ये शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर आपले शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी स्कॉलरशिप दिली जाते.
या स्कॉलरशिप चे वैशिष्ट्ये
1-या विद्यार्थ्यांना इयत्ता सातवी आणि आठवी मध्ये 55 टक्के गुण आहेत असे विद्यार्थी पात्र असतात.
2-ही स्कॉलरशिप प्रति वर्ष बारा हजार रुपये याप्रमाणे देण्यात येते.
- या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याचा कालावधी हा ऑगस्ट ते नोव्हेंबर पर्यंत असतो.
- या स्कॉलरशिप साठी पात्र विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
- स्कॉलरशिप राष्ट्रीय छात्रवृत्ति पोर्टल म्हणजेच एन एस पी च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आपलिकेशन करावे लागते.
Share your comments