महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शैक्षणिक वर्ष 2017-18,2018-19 या वर्षातील टंचाईग्रस्त, दुष्काळग्रस्त आणि अवेळी झालेल्या पावसामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क प्रतिपृती योजनेसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की महाराष्ट्रातील कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव लक्षात घेता या योजनेच्या ऑनलाईन प्रणाली 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात जवळजवळ चार लाख 51 हजार 48 विद्यार्थ्यांचे प्रस्ताव दाखल झाले असून त्यातील दोन लाख 80 हजार 136 विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती मिळाली आहे.
जे विद्यार्थी अजून पर्यंत राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत करण्यात आले आहे. राज्य शिक्षण मंडळामार्फत शैक्षणिक वर्ष 2017 ते 19 पर्यंतच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसपात्र असलेल्या आणि
अजून पर्यंत परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती न झालेल्या विद्यार्थ्यांना ही प्रतिपूर्ती करण्यासाठी http:feerefund.mh-ssc.ac.in या लिंक वर ऑनलाइन पद्धतीने माहिती सादर करावी लागेल. ही लिंक मंडळाच्या mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Share your comments