जर आपण शासनाचा विचार केला तर समाजातील प्रत्येक घटकांसाठी शक्य तेवढ्या योजनांची अंमलबजावणी करून त्या माध्यमातून त्या त्या घटकातील व्यक्तींसाठी काही सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न असतो. या मध्यम शेतकरी असो की कामगार किंवा इतर क्षेत्रातली लोकं यांच्यासाठी फायदेशीर बऱ्याच योजना आहेत.
यामध्ये विद्यार्थ्यांना देखील समावेश असून विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विविध प्रकारच्या योजना राज्य शासन राबवत असते. अशीच एक राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण योजना असून विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. या लेखात या योजनेबद्दल माहिती घेऊ.
स्वाधार योजना आहे विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर
ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून अमलात आणली गेली असून इयत्ता अकरावी आणि बारावी तसेच डिप्लोमा प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल विद्यार्थ्यांसाठी या योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्ष 51 हजार रुपयांची मदत करून देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी पात्रता
1- अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील सर्व विद्यार्थी यासाठी पात्र आहेत.
2- संबंधित उमेदवाराचे जे काही कौटुंबिक आर्थिक उत्पन्न आहे ते वार्षिक अडीच लाखाहून जास्त नसावे.
3- तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कालावधी हा दोन वर्षापेक्षा अधिक नसावा.
4- संबंधित विद्यार्थी हा दहावी मध्ये 60 टक्के मिळवून आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेला असावा.
5- दिव्यांग उमेदवारांना परीक्षेत किमान 40 टक्के गुण प्राप्त करणे गरजेचे आहे.
लागणारी कागदपत्रे
विद्यार्थ्याकडे स्वतःचा आधार कार्ड, ओळखपत्र तसेच बँकेचे खाते पुस्तक आणि उत्पन्नाचा दाखला इत्यादी असणे गरजेचे आहे.
या योजनेचा लाभ कसा घ्यावा?
जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. या योजनेची अधिक माहिती तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊन घेऊ शकता.
Share your comments