मुंबई : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचानिकाल कधी जाहीर होतो, याची अनेकजण आतुरतेनं वाट पाहात होते. अखेर आज शुक्रवार म्हणजेच 02 जून रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पुढच्या काहीच तासांमध्ये आपला निकाल पाहता येणार आहे.
यंदा राज्यात 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती. यावर्षी 2 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत परीक्षा चालली होती. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता निकाल हा बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर होईल.
दहावीचा निकाल उपलब्ध होणारे संकेतस्थळ असे :
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org.in
https://hindi.news18.com/news/career/board-resultd-maharashtra-boars
https://www.indiatoday.in/eduction-today/maharashtra-board-class-10th-result-2023
http://mh10.abpmajha.com. तसेच www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.
एका क्लिकवर बघता येईल निकाल
यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल.
यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.
यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.
यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे.
यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.
यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे.
Share your comments