प्रत्येक पालकांचे आपल्या पालन विषयी विशेष स्वप्न असतात.त्यामध्ये मुलांना उत्तम शिक्षण मिळावे. त्यांचे भविष्य प्रकाशमान व्हावे.यासाठी सगळेच पालक जिवाचे रान करीत असतात.त्यातल्या त्यात आपल्या मुलांना विदेशात शिक्षणाची संधी उपलब्ध होणे म्हणजे सोने पे सुहाना असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
परंतु विदेशात शिक्षण घेणे म्हटले म्हणजेफार मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता असते.परंतु आता ही चिंतादूर करण्याचे कामदेशातील अग्रगण्य बँक एसबीआय करणार आहे.
काय आहे एसबीआयचे शैक्षणिक कर्ज व त्याची प्रक्रिया?
तुमच्या मुलांना परदेशात शिकवण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर एक एसबीआय बँक तुमच्यासाठी खास शैक्षणिक कर्ज प्लान घेऊन आली आहे. यामध्ये तुम्हाला 7 लाख 50 हजार पर्यंतते दीड कोटी रुपयांपर्यंतचा कर्जाचा लाभ मिळतो.
.विदेशात शिक्षणघेण्याचे ज्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे अशांसाठीस्टेट बँक ऑफ इंडिया एक विशेष शिक्षण कर्ज योजना घेऊन आली आहे. या योजनेला बँकेने जागतिक ऍडव्हेजेंटअसे नाव दिले आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहे.या योजनेच्या माध्यमातूनमुले पदव्युत्तर पदवी,पदविका अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्रे किंवा डॉक्टरेट अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.या योजनेअंतर्गत तुम्हाला शिक्षण कर्ज म्हणून 7 लाख 50 हजार ते दीड कोटी रुपयांपर्यंतकर्ज मिळू शकते. या कर्जावर बँकेने व्याजदर हा 8.65 टक्के ठेवला आहे तर मुलींसाठी त्यामध्ये 0.50टक्क्यांची सवलत दिली आहे.या कर्जामध्ये तुमचा प्रवासाचा खर्च,शिक्षण शुल्क,लायब्ररी तसेच प्रयोगशाळेचा खर्च,परीक्षा फीस,पुस्तके,प्रकल्प कार्य,प्रबंधतसेच अभ्यास दौरे यांचाही समावेश करण्यात आला आहे.
शैक्षणिक कर्जासाठी अर्ज कसा कराल
दहावी,बारावी आणि पदवी च्या मार्कशीट आणि प्रवेश परीक्षेचा रिझल्ट द्यावा लागतो.तुमच्याकडे कॉलेज ऑफर लेटर,प्रवेश खर्च, स्कॉलरशिप इत्यादीची संपूर्ण माहिती लागेल.पासपोर्ट आकाराचा फोटो,विद्यार्थ्यांच्या पालकांचाफोटो,आधार कार्डची प्रत आणि पालकांचे सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट आवश्यक असतो.
या कर्जाची परतफेड हे कर्ज घेतल्यानंतर सहा महिन्यांनी आपणकर्जाची रक्कम भरायला सुरुवात करू शकता.कर्ज घेतले त्या तारखेपासून पंधरा वर्षापर्यंत त्याची परतफेड करता येऊ शकते.त्यामुळेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी ही चांगली योजना आहे.
Share your comments