मागच्या वर्षी कोरोना महामारी मुळे अनेक जणांच्या रोजगारावर गदा आली. अनेक जणांच्या नोकऱ्या हातातून गेल्या.बेरोजगारीची कुऱ्हाड तरुणांवर कोसळली.त्यामुळे बरेच तरुण नोकरीच्या शोधात आहेत.
अशा तरुणांसाठी खुशखबर आहे.इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये तब्बल 570 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. यासाठीचे अधिसूचना जारी करण्यात आली असून टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेंटिस पदांसाठी भरती होतआहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील अशा उमेदवारांनी iocl.com या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

या भरतीसाठी असलेल्या राज्यनिहाय जागा….
- महाराष्ट्रासाठी 212 जागा
- गुजरात साठी 61 जागा
- छत्तीसगड साठी 22 जागा
- गोव्यासाठी 3 जागा
- मध्यप्रदेश राज्यासाठी 40 जागा
या भरतीसाठी असलेली शैक्षणिक पात्रता अनुभव..
ज्या उमेदवारांना टेक्निकल अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करायचा असेल अशा उमेदवारांनी इंजिनिअरिंगच्या संबंधित शाखेतून डिप्लोमा पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून अथवा महाविद्यालयातील किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल,इन्स्ट्रुमेंटेशन,सिव्हिल,इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या शब्दाबद्दल डिप्लोमा पूर्ण केलेल्या उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच काही जागांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.(संदर्भ-लोकमत)
Share your comments