राज्यातील नवयुवक व युवती पोलीस प्रशासनात (Police Administration) काम करण्याचे स्वप्न बघत असतात. यासाठी नवयुवक तरुण व तरुणी अहोरात्र काबाडकष्ट करत मैदानी चाचणीसाठी सराव करतात तसेच रात्रीचा दिवस करत लेखी परीक्षेसाठी अभ्यास करत असतात. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस भरतीची (Maharashtra Police recruitment) तारीख राज्य शासन (Maharashtra Government) काही जाहीर करेना.
यामुळे हजारो युवक नैराश्यात बघायला मिळत होते. मात्र राज्याचे गृहमंत्री यांनी नुकतेच पोलीस भरती (Police Recruitment 2022) संदर्भात एक महत्त्वाचे विधान केले आहे. यामुळे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या नवयुवकांच्या चेहऱ्यावर निश्चितच समाधान बघायला मिळणार आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मते, राज्यात एकूण 50 हजार पोलिसांची पदे रिक्त आहेत. यापैकी साडेपाच हजार पदांची भरती आता अंतिम टप्प्यात असून जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय अजून सात हजार पदांची भरती काढली जाणार असल्याचे मंत्री साहेबांनी स्पष्ट केले आहे. येत्या 15 जून पासून यासंदर्भात असणारी आवश्यक प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.
एवढेच नाही या सात हजार पदांची भरती झाल्यानंतर अजून पंधरा हजार पदांची भरती केली जावी यासाठी मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळ या मेगा भरतीला निश्चितच परवानगी देईल असा आशावाद देखील या वेळी बोलून दाखवला.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मते सध्या पोलीस प्रशासनावर खूप तान आहे तो कमी करण्यासाठी ही भरती प्रक्रिया घडवून आणणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Ration Card Update: मोठी बातमी! 'हे' एक काम केलं नाही तर रेशन मिळणार नाही; वाचा याविषयी
निश्चितच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस भरती बाबत दिलेली ही अद्ययावत माहिती पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या नवयुवकांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन आली आहे. यामुळे अभ्यास करणाऱ्या नवयुवक व युवतींच्या जोशात मोठी वाढ होईल आणि नक्कीच आगामी काही दिवसात मेगा पोलीस भरतीचे आयोजन बघायला मिळेल.
Share your comments