1. शिक्षण

नीट यूजीसी परीक्षेचा पॅटर्न बदलला, होतील चार भागात पेपर

यावर्षी एनटीएने नीट यूजीसी परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. नीट यूजीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्यांदाच या परीक्षेचा पेपर हा चार भागात विभागला आहे. या परीक्षेमध्ये बायोलॉजी आणि झूलॉजी चे वेगवेगळे प्रश्न विचारले जातील. यावेळी या परीक्षेत 180 ऐवजी 200 प्रश्न विचारले जाणार आहेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
ugc-net exam

ugc-net exam

 यावर्षी एनटीएने नीट यूजीसी परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. नीट यूजीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्यांदाच या परीक्षेचा पेपर हा चार भागात विभागला आहे. या परीक्षेमध्ये बायोलॉजी आणि झूलॉजी चे वेगवेगळे प्रश्न विचारले जातील. यावेळी या परीक्षेत 180 ऐवजी 200 प्रश्न विचारले जाणार आहेत.

 फिजिक्स, केमिस्ट्री, झुला जी आणि बॉटनी इत्यादी विषय दोन विभागात विभागले गेले आहेत. या मधील पहिले 35 प्रश्न आहे अनिवार्य असतील. दुसऱ्यात 15 प्रश्न असतील. या प्रश्नांपैकी फक्त दहा सोडवावे लागतील. याच पद्धतीने 200 प्रश्नांपैकी 180 प्रश्न सोडवणे हे अनिवार्य आहे. यामध्ये मागील वर्षाप्रमाणेच जास्तीत जास्त गुण 720 असतील. या परिषद प्रत्येक प्रश्नाला चार गुणांचा असेल तर चुकीच्या उत्तरासाठी एका गुणाची कपात केली जाईल.

 या परीक्षा  पद्धतीप्रमाणेच नीट यूजी अर्ज प्रक्रियेतही बदल करण्यात आला आहे.अर्ज भरताना तो आता दोन टप्प्यात भरावा लागणार आहे.त्यातील पहिल्या टप्प्यात शैक्षणिक पात्रता आणि पत्त्यासह अन्य प्राथमिक माहिती द्यावी लागेल. पासपोर्ट आणि पोस्टकार्ड साईजचे प्रत्येकी एक फोटो लागतील. तसेच अर्ज भरतांना डाव्या हाताचा अंगठा ची निशानी आणि स्वाक्षरी अपलोड करावे लागेल. या परीक्षेचा अर्ज हा सहा ऑगस्ट रोजी रात्री अकरा पन्नास पर्यंत भरले जाऊ शकतील. अर्जात  सुधारणा ही आठ ते 12 ऑगस्ट दरम्यान करता येईल. 20 ऑगस्टला परीक्षा केंद्र डिक्लेअर केले जातील. दुसऱ्या टप्प्यातील कर्जाची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. परीक्षेत 13 सप्टेंबर च्या दुपारी 2 ते 5  वाजेपर्यंत देशातील 198 शहरात घेतली जाणार आहे. ही परीक्षा पंजाबी आणि मल्याळम या भाषांसह जवळ जवळ तेरा भाषांमध्ये  प्रवेश परीक्षा होणार आहे.

 

  नीट पीजी प्रवेश परीक्षा 11 सप्टेंबर रोजी

नीट पीजी प्रवेश परीक्षेची तारीख मंगळवारी जाहीर करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी सांगितले की, नीट पीजी 2021 ची परीक्षा 11 सप्टेंबरला होईल. पूर्वी ही परीक्षा 18 एप्रिल रोजी प्रस्तावित होती परंतु 22 जुलै रोजी एम्स आपली आय एनआयसीईटी प्रवेश परीक्षा आयोजित करेल. या अंतर्गत गेम्स नवी दिल्ली आणि इतर एम्स पीजीआयएमईआय चंदिगड, जीपमेर  पुदूचेरी तथा निमहेन्स बंगलोरमध्ये एमडी – एम एस मध्ये प्रवेश दिला जाईल.

 

English Summary: pattern change to net ugc exam Published on: 14 July 2021, 01:34 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters