1. शिक्षण

शेती शिक्षण: 'या' कृषी विद्यापीठात सुरु होणार 'सेंद्रिय शेतीचा सर्टिफिकेशन' अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना होईल फायदा

सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्रसरकार देखील विविध पातळीवर काम करत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना प्रोत्साहन(Encouragement to Farmer)मिळेल हा त्यामागचा हेतू आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
organic farming certification course start at punjaabrao deshmukh krushi vidypith

organic farming certification course start at punjaabrao deshmukh krushi vidypith

 सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा  कल सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्रसरकार देखील विविध पातळीवर काम करत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना प्रोत्साहन(Encouragement to Farmer)मिळेल हा त्यामागचा हेतू आहे.

तसेच राज्यातील विविध कृषी विद्यापीठे देखील सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी निरंतर काम करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने याबाबतीत पुढाकार घेऊन सेंद्रिय शेतीतील  सर्टिफिकेशन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

जरी आपल्या भारताचा विचार केला तर  संपूर्ण देशात पहिल्यांदाच सरकारी स्तरावर अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबविला जात असल्याचे सांगितले जात आहे.  सेंद्रिय सर्टिफिकेशन अभ्यासक्रम तयार केला जात असून यासाठी फ्रान्स येथील इकोसर्ट आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ एकत्रितपणे काम करीत आहेत.

नक्की वाचा:महत्त्वाचा कृषी सल्ला - निंबोळी अर्काचे फायदे आणि बनवण्याची पद्धत

 सेंद्रिय शेतीला(Organic Farming)भविष्यात चांगली चालना

 सध्या कोरोना काळापासून लोकही आरोग्याबाबत जागरूक झाले असून चांगल्या आरोग्यासाठी सेंद्रिय उत्पादनांना चांगली पसंती मिळू लागली आहे व त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांना भावदेखील चांगला मिळतो. विविध पद्धतीने सेंद्रिय शेती क्षेत्रात काम वाढत असून अनेक शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती उत्पादने पिकवू लागले आहेत

सेंद्रिय शेतीमध्ये शेतकरी जे काही उत्पादन पिकवतात ते सेंद्रिय आहे किंवा नाही हे काही मापदंड याच्या आधारे ग्राह्य धरले जाते.

नक्की वाचा:करियर वाटा: 'हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट' एक विद्यार्थ्यांसाठी ठरू शकतो फायदेशीर करिअरचा मार्ग, जाणून घ्या सविस्तर माहिती

या सगळ्या प्रक्रियेत सर्टिफिकेशन म्हणजेच प्रमाणीकरण हा एक मोठा भाग मानला जातो.सध्या देशात आणि राज्यात काही मोजक्या संस्थांकडून असेल सर्टिफिकेशन करून दिले जाते.

या क्षेत्रात इकोसर्ट ही कंपनी फार मोठ्या प्रमाणात काम करते. परंतु या क्षेत्रांमध्ये पारंगत आणि ज्ञान असलेल्या मनुष्यबळाचे सातत्याने कमतरता जाणवत राहते.

त्यामुळे येणाऱ्या काळात सेंद्रिय शेती ला असलेले उज्वल भविष्य आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ याची गरज पाहता हा सेंद्रिय शेती सर्टिफिकेशन कोर्स खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

जवळजवळ एक वर्ष कालावधीचा हा अभ्यासक्रम असून यामध्ये संस्थेचे तज्ञ मार्गदर्शन करतील. त्यासोबतच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तज्ञांकडून देखील प्रॅक्टिकल आणि अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून या अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे.

नक्की वाचा:बिग ब्रेकिंग! ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा, शिक्षण क्षेत्रात खळबळ

English Summary: organic farming certification course start at punjaabrao deshmukh krushi vidypith Published on: 13 July 2022, 01:04 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters