गेल्या काही वर्षात लहान मुलांचे मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे धोका वाढला आहे. याचा मुलांच्या अभ्यासावर आणि आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असून त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर होत आहे.
यामुळे आता उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकेकूरवाडी (Jakekurwadi) या गावाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे या गावकऱ्यांचे कौतुक केले जात आहे. त्यांनी रोज दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वांचे मोबाईल आणि टीव्ही सायंकाळी सहा से आठ वाजेपर्यंत बंद ठेवले जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना या काळात अभ्यास करावा, असा यामागे उद्देश आहे. हा उपक्रम लक्षात राहावा म्हणून ग्रामपंचायतीवर भोंगा लावण्यात आला आहे.
रोजगार मेळावा प्रारंभ, 75 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरीत, मोदींची घोषणा..
याकाळात हा भोंगा वाजतो, यामुळे सगळेजण अभ्यास करतात. पालकांचे देखील आपल्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळतो. अनेक लहान मुलांकडे सध्या त्यांच्या हातात सतत मोबाईल दिसतात.
शेतकऱ्यांची परिस्थिती बघून कृषिमंत्र्यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन, महावितरणने थांबवली वसुली
दरम्यान, मुले तासंतास मोबाईलला चिकटून असतात. त्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे गाऱ्हाणे पालक मांडत असतात. नेमके सायंकाळच्या वेळेस घरात कुणीतरी टीव्ही लावून मालिका पाहण्यात गुंतून जातात. त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतो.
महत्त्वाच्या बातम्या;
गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर केला नाही, कारखान्यावर कारवाई करा
यामध्ये 15 कोटींपेक्षा जास्त मिरचीचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे
माळेगाव कारखान्याचा निर्णय उच्च न्यायालयानेही फेटाळला, पवार समर्थकांना मोठा धक्का..
Share your comments