1. शिक्षण

ऑस्ट्रेलियन कृषी क्षेत्राची होईल ओळख! राहुरी कृषी विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियातील 'मरडॉक विद्यापीठा'सोबत सामंजस्य करार

कृषी विद्यापीठे,कृषी विज्ञान केंद्रे इत्यादी कृषी विषयक संस्थांचा कृषीक्षेत्रातील प्रगतीमध्ये खूप मोठा वाटा आहे. देशातील विविध कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रे शेती संबंधित विविध पिकांच्या चांगल्या उत्पादनक्षम जातींचा शोध लावण्याकामी खूप महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
mahatma phule krushi vidyapith

mahatma phule krushi vidyapith

कृषी विद्यापीठे,कृषी विज्ञान केंद्रे इत्यादी कृषी विषयक संस्थांचा कृषीक्षेत्रातील प्रगतीमध्ये खूप मोठा वाटा आहे. देशातील विविध कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रे शेती संबंधित विविध पिकांच्या चांगल्या उत्पादनक्षम जातींचा शोध लावण्याकामी खूप महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.

कृषी विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात करून कृषी क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. याचाच एक भाग म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि ऑस्ट्रेलियातील मरडॉक विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.

नक्की वाचा:'AJAI' कृषी पत्रकारितेतील ऐतिहासिक क्षण: केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला!

यासंबंधीची बैठक मुंबई येथे कुलगुरू डॉ.पी.जी. पाटील आणि ऑस्ट्रेलियाच्या संस्कृती, कला व आंतरराष्ट्रीय शिक्षण विभागाचे मंत्री डेव्हिड टेम्पलमन यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली.

 'या' सामंजस्य कराराचे होणारे फायदे

 महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्येचे विद्यार्थी कृषी क्षेत्राचे शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील शिक्षणाची माहिती तसेच ऑस्ट्रेलियन कृषी क्षेत्रा मधील नाविन्यपूर्ण कौशल्य आत्मसात करता यावे,हा या करारा मधील महत्वाचा उद्देश आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांचे अच्छे दिन! फ्लॉवरच्या 'या' वाणाच्या लागवडीतून शेतकरी घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न

या कराराअंतर्गत, ऑस्ट्रेलियाचे विद्यार्थी या ठिकाणी येथील तर आपल्याकडे विद्यार्थी ऑस्ट्रेलियाला जाऊन त्या ठिकाणी अभ्यास करतील.

यामुळे या उभय दोन्ही विद्यापीठांमध्ये कृषी शिक्षण व संशोधन याबाबतीत देवाण-घेवाण होईल व याचा फायदा दोनही विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक तसेच प्राध्यापक व पर्यायाने शेतकरी यांना होईल.या सामंजस्य करारावर संशोधन व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.शरद गडाख व आंतरराष्ट्रीय मरडॉक विद्यापीठाचे कुलपती श्री.केली स्मिथ यांनी सह्या केल्या.

नक्की वाचा:Farming Technique: भारीच की रावं! एकाच शेतातून मिळणार फळे, धान्य, भाजीपाला; जाणून घ्या दुप्पट शेतीच्या खास पद्धती

English Summary: memorandum understanding between rahuri krushi vidyapith and mardok university australia Published on: 23 July 2022, 03:50 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters