Job Recruitment: सध्या राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत नोकरीसाठी जाहिराती निघाल्या असून केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील काही विभागाच्या अंतर्गत जाहिराती करण्यात येत आहेत. त्यामुळे कित्येक दिवसापासून सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींकरिता दिलासा मिळताना दिसून येत आहे.
याच अनुषंगाने सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांकरिता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या अंतराळ विभागाच्या अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो च्या अंतर्गत अहमदाबाद या ठिकाणी असलेल्या स्पेस एप्लीकेशन सेंटर येथे तंत्रज्ञान आणि ड्राफ्ट्समनच्या एकूण पस्तीस पदांच्या भरती करिता 1 ऑगस्ट 2023 रोजी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली असून या अंतर्गत आता विविध पदांची भरती केली जाणार आहे.
इस्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
भारत सरकारच्या अंतराळ विभागाच्या अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या अहमदाबाद येथे स्थित स्पेस एप्लीकेशन सेंटर या ठिकाणी तंत्रज्ञ आणि ड्राफ्टसमनच्या एकूण पस्तीस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून एक ऑगस्ट 2023 रोजी जारी करण्यात आली आहे. या अंतर्गत फिटर, मशिनिस्ट, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, आय सी टी एस एम, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल, केमिकल तसेच टर्नर आणि रेफ्रिजरेटरसाठी आवश्यक तंत्रज्ञ आणि ड्राफ्ट्समन या पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या पदांकरिता ज्या कु lणाला अर्ज करायचा असेल असे इच्छुक उमेदवार ISRO SAC अधिकृत करिअर पोर्टलच्या माध्यमातून careers.sac.gov.in यावर असलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया दोन ऑगस्ट 2023 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. याकरिता उमेदवारांना नोंदणी करणे गरजेचे असून त्यानंतर मिळालेल्या लॉग इन आयडी व पासवर्ड च्या मदतीने लॉगिन करायचे आहे व अर्ज सबमिट करायचा आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
इस्रोच्या स्पेस एप्लीकेशन सेंटरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार तंत्रज्ञ पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्डाकडून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे असून बाकीच्या रिक्त पदांकरिता आयटीआय किंवा एनटीसी किंवा एनएसी प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे आहे.
आवश्यक वयोमर्यादा
या पदांकरता अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय शेवटची तारीख म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी कमीत कमी 18 वर्ष आणि कमाल 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच जे उमेदवार राखीव प्रवर्गातील आहेत अशा उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये केंद्र सरकारचे जे काही आरक्षणाचे नियम आहेत त्यानुसार सुट दिली जाणार आहे.
Share your comments