सध्याचे युग हे यंत्र युग आहे. जवळ-जवळ सगळ्या क्षेत्रांमध्ये मनुष्याची जागा हे यंत्र घेऊ पाहत आहेत. मग याला शेती व्यवसाय तरी कसा अपवाद राहील. शेतीमध्ये नांगरणी, कुळवणी, तण काढणे अशा प्रकारची बरीच कामे यंत्राच्या साहाय्याने होऊ लागले आहेत व त्याद्वारे शेतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत झाली आहे म्हणून यंत्राच्या साह्याने शेतीचे उत्पन्न वाढविण्यास हातभार लावणारी शाखा म्हणजे अभियांत्रिकीची विशेष शाखा होय.
कृषी व्यवसाय हा जगातील जुना आणि सगळ्यात मोठा असा व्यवसाय आहे कृषी अभियांत्रिकी च्या बहुतेक प्रश्नात जैव वस्तू आणि विक्री यांचा संबंध येतो. आणि ते सगळे प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी कृषी अभियंत्याला भौतिक शास्त्र व अभियांत्रिकी चा उपयोग करावा लागतो. शेतकरी आता कृषी व्यवसायात आणि प्रकारची यंत्रे द्रव्य मालवाहतुकीचे साधने वापरतात. त्यामुळे या सगळ्या प्रकारच्या विविध कामांमध्ये शेतकऱ्याला कृषी अभियंत्यांची गरज भासते किंवा त्याची मदत घ्यावी लागते.
कृषी अभियांत्रिकीचे विभाग
- यांत्रिक विभाग= या विभागांमध्ये मुख्यत्वेकरून यांत्रिक शक्ति उत्पन्न करणारी साधने, विहीर खोदण्यासाठी लागणारे साहित्य, नांगर, ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, कापणी यंत्र, शेतमाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ची साधने अशा सर्व विषयांचा समावेश यांत्रिक विभागात होतो.
- इमारत बांधणी विभाग= या विभागात मुख्यत्वेकरून शेतकऱ्यांचे स्वतःचे घर, बी बियाणे ठेवण्याच्या कोट्या, धान्य साठवण्याची जागा, गोठे, वैरण साठविण्याच्या झोपड्या, शेतातील कुंपणे वगैरे विषय या विभागात येतात
- पाणी पुरवठा विभाग= या विभागांमध्ये मुख्यत्वेकरून तलाव बांधणे, विहीर खोदणे, पंप बसवून पाण्याचा पुरवठा करणे जलसिंचन, जमिनीवरचा आणि जमिनीखालचा पाण्याचा निचरा इत्यादी विषय या विभागात येतात.
- मृदा संधारण विभाग= या विभागांमध्ये नदीच्या पुराने पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप थांबवणे आणि जमिनीमध्ये पाणी मुरवण्याची व्यवस्था करणे या संबंधीची कामे असतात.
- पिकांवरील रोगराई विभाग= या विभागांमध्ये प्रामुख्याने शेतावर उभ्या असलेल्या पिकांवर करावयाच्या प्रक्रिया, कीटकनाशकांचा वापर व त्यासाठी लागणारी उपकरणे असे विषय येतात.
- विद्युत शक्ती विभाग= या विभागात यंत्रांना लागणारी शक्ती विद्युत चलित्र यांच्या साह्याने पुरवण्याची व्यवस्था, जमिनीच्या पृष्ठभागाखाली केबल पुरून त्यामध्ये विद्युत प्रवाह पाठवून जमिनीचे तापमान नियंत्रित करण्याची व्यवस्था, कुंपणाच्या धातूच्या तारांना कमी विद्युत दाबाचा पुरवठा करून शेतीचे रक्षण करण्याची व्यवस्था इत्यादी विभाग असतात.
जर शेती जमिनीचे व वातावरणाचे तापमान व आर्द्रता या बाबतीत व्यवस्थित नियंत्रण करता आले तर शेतातील पीक लवकर तयार करता येते व उत्पन्न वाढण्यास मदत होते. हे काम सुरवातीला बरेच खर्चाचे होते. परंतु हे काम फायद्याचे असल्यामुळे त्याला व्यावहारिक रूप देण्याचे काम पुष्कळ ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. भारतामध्ये सन 1942 झाली आलाबाद एग्रीकल्चर इन्स्टिट्यूटमध्ये कृषी अभियांत्रिकीच्या पदवी परीक्षेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर खरकपूर, पंतनगर, लुधियाना व उदयपुर येथे हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. महाराष्ट्रातही राहुरी व पुणे येथे असा अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
Share your comments