Maharashtra board 12th (HSC) result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उद्या २१ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये निकाल पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
काही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यापाठोपाठ महाराष्ट्र बोर्डाकडून आज अखेर निकालाची तारीख जाहीर केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.
'या' वेबसाईटवर पाहता येणार निकाल
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://result.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org
दरम्यान, यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्चदरम्यान पार पडली. राज्यातून 15.13 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.MSBSHSE नियमांनुसार बोर्डाच्या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी आणि तोंडी परीक्षांमध्ये मिळून 35 गुण मिळणे आवश्यक आहे.
Share your comments