Job Alert : भारतीय पोस्ट विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. दहावी पास असलेल्या व भारतीय टपाल विभागात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. टपाल खात्यातील ही भरती 10वी पास असलेल्या उमेदवारांसाठी आहे. ही भरती पोस्ट विभागामार्फत देशभरात राबविली जाणार आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ग्रामीण डाक सेवकाच्या एकूण 38926 पदांची भरती भारतीय पोस्ट मार्फत राबविली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 मे 2022 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जून 2022 आहे. यामुळे ज्या उमेदवारांना, अर्ज करायचा असेल अशा इच्छुक असलेल्या 10वी पास उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
नोकरीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
»ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराने 10वी पास केलेली असावी.
»उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
»आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना भारत सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
»5 जून 2022 रोजी वयाची गणना केली जाईल.
»अर्जासाठी उमेदवारांना 100 रुपये चलन स्वरुपात भरावे लागणार आहेत याची नोंद उमेदवाराने घ्यावी.
»सर्व कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील.
»बेसिक कंप्यूटर नॉलेज असणे अनिवार्य राहणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने द्वारे देण्यात आलेले एमएससीआयटी सर्टिफिकेट ग्राह्य राहील.
निश्चीतच दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. यामुळे ज्या इच्छुक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर संबंधित संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करावा असे आवाहन करण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 5 जून 2022 ही तारीख शेवटची ठरवण्यात आली आहे. यामुळे या तारखेआधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करणे अपरिहार्य राहणार आहे.
संबंधित बातम्या
Farmers Income : भारतीय शेतकरी शेतीतुन किती कमवतो? नाही माहिती; मग वाचा याविषयी सविस्तर
Small Business Idea : फक्त 3 हजारात सुरु करा हा व्यवसाय आणि कमवा बक्कळ नफा; वाचा याविषयी
Share your comments