1. शिक्षण

Job: सुवर्णसंधी! मुंबई हायकोर्टात 'या' पदासाठी आहे नोकरीची संधी, मिळेल 31 हजार पगार

सध्या वेगवेगळ्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या जाहिराती निघत असून विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करण्याची हीच वेळ आहे. आता बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांची तयारी करतात. अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती केली जाणार असून यासाठीची नोटिफिकेशन अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीविषयी या लेखात माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
job in mumbai highcourt

job in mumbai highcourt

 सध्या वेगवेगळ्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या जाहिराती निघत असून विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करण्याची हीच वेळ आहे.

आता बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांची तयारी करतात. अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती केली जाणार असून यासाठीची नोटिफिकेशन अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीविषयी या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:SBI Clerk Recruitment 2022: महाराष्ट्रात SBI मध्ये 747 जागांची भरती तर पूर्ण भारतात 5000 हून अधिक जागा; असा करा अर्ज

 मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती

1- एकूण पदे- मुंबई उच्च न्यायालयात एकूण 76 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.

2- पदाचे नाव- या भरतीच्या माध्यमातून सॉफ्टवेअर प्रोग्रामर( डेव्हलपर/कोडर्स), डेटा एंट्री ऑपरेटर या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

3- पदनिहाय रिक्त जागा- या भरतीच्या माध्यमातून सॉफ्टवेअर प्रोग्रामर या पदाच्या एकूण 26 जागा रिक्त असून त्या भरल्या जाणार आहेत. तर डेटा एंट्री ऑपरेटरचे एकूण 50 रिक्त जागा असून त्या या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

4- शैक्षणिक पात्रता- इच्छुक उमेदवार सॉफ्टवेअर प्रोग्रामर या पदासाठी अर्ज करतील असे उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून कम्प्युटर सायन्स/ एप्लीकेशन/ कम्प्यूटर मध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा तरी अनुभव असावा. तर डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण संस्थेतून पदवी असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी टायपिंग स्पीड 40 डब्ल्यूपीएम असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित उमेदवाराकडे एमएससीआयटीचे प्रमाणपत्र असावे.

नक्की वाचा:Job Update: पदवीधरांसाठी 'या'बँकेत आहे नोकरीची संधी, वाचा यासंबंधी डिटेल्स

5- मिळणारा पगार- ज्या उमेदवारांची सॉफ्टवेअर प्रोग्रामर( डेवलपर/कोडर्स) या पदासाठी निवड होईल अशा उमेदवारांना प्रतिमाह 40 हजार 894 रुपये पगार दिला जाईल. तर डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी ज्या उमेदवारांची निवड होईल अशा उमेदवारांना प्रतिमाह एकतीस हजार रुपये इतका पगार मिळेल

6- वयोमर्यादा- या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे वय किमान 21 ते कमाल 40 वर्षा दरम्यान असावे.  त्यासोबतच एस सी/ एसटी उमेदवारांना पाच वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

या भरतीमध्ये आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादामध्ये काही सरकारी नियम आहेत त्यानुसार सवलत देण्यात येणार आहे. यासंबंधीची तपशील नोटिफिकेशन मध्ये पहावा.

7- आवश्यक कागदपत्रे-ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्याच्याकडे दहावी,बारावी आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे,लिव्हिंग सर्टिफिकेट,

जातीचा दाखला( उमेदवार मागासवर्गीय असतील तर), ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड,  ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट आकाराचा फोटो हे कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

8- अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक- ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल ते 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत करू शकता. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन अत्यंत काळजीपूर्वक वाचावे.

नक्की वाचा:Goverment Decision: राज्यातील लिपिकांची रिक्त पदे 'एमपीएससी'मार्फत भरली जाणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

English Summary: golden job oppourtunity in mumbai high court so take chance to this recruitment Published on: 28 September 2022, 04:14 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters