सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षासाठी च्या राजश्री शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना अंतर्गत विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी च्या मुदततीस 30 जून पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुदतवाढ राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांन परदेशातील विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी संबंधित स्कॉलरशिप चा लाभ घेण्यासाठी ची मुदत18 जून पर्यंत देण्यात आलेली होती. परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर बहुतांश विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठाकडून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विहित मुदतीत ऑफर लेटर प्राप्त न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.
या विनंतीचा विचार करूनमंत्री मुंडे यांनी विभागाला 30 जून 2021 पर्यंत मुदत वाढ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार मुदतवाढ मिळाल्याने अनुसूचित जातीतील इच्छुक विद्यार्थ्यांन मोठा दिलासा मिळाला आहे.
www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर परदेश शिष्यवृत्तीसाठी विहित नमुन्यातील अर्ज इच्छुक विद्यार्थ्यांनीरोजगार या लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावे.
सदर परिपूर्ण अर्ज swfs. application.2122@gmail.com या मेल आयडीवर कागदाची प्रत विहित मुदतीत व आवश्यक त्या कागदपत्रांसह खालील पत्त्यावर पाठवायचे आहे.
समाज कल्याण आयुक्तालय 3,
चर्च पथ,महाराष्ट्र राज्य, पुणे-411 001
असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
Share your comments