यावर्षीच्या येऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा या प्रचलित पद्धतीने घेण्यात येतील असा निर्णय शासनाने घेतला आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची सोय व्हावी या दृष्टिकोनातून शाळा तिथे केंद्र उपकेंद्र या पद्धतीचे नियोजन केले असून इयत्ता बारावी साठी परीक्षा केंद्र आणि उपकेंद्रांची एकूण संख्या नऊ हजार 613 तर दहावी साठी परीक्षा केंद्र व उपकेंद्राचे संख्या 21 हजार 349 इतकी असेल माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीचे नियमित वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता होती.
संबंधित शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुरुवातीस ऑनलाइन पद्धतीने ऑक्टोबर पासून टप्प्याटप्प्याने नियमितपणे वर्ग सुरू करण्यात आले परंतु आताच्या परीक्षा या प्रचलित पद्धतीने होत असून बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना देखील सुरुवात झाली आहे.
यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे की विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असेल तर शाळा तिथे परीक्षा केंद्रे अथवा उपकेंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.
Share your comments