बीएससी(ओनर्स ), बीएससी. ( ओनर्स )उद्यान विद्या, बी. एस सी(ओनर्स ) वनविद्या, बीएससी(ओनर्स ) सामाजिक विज्ञान, बीएससी(मत्स्य विज्ञान), बी टेक( अन्नतंत्रज्ञान), बीएससी( एम बी एन), बीबीएम( कृषी), बीएससी(ओनर्स ) कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा आठ पदव्या समतुल्य मानल्या जात नव्हत्या.
जर शैक्षणिक पॅटर्नचा विचार केला तर वर्षानुवर्षे फक्त बीएससी(ओनर्स ) कृषी या पदवीला नोकरी किंवा सीईटीमध्ये प्राधान्य दिले जात आहे.
त्यामुळे कृषी शाखेतील इतर विद्यार्थ्यांची कुचंबणा होताना पाहायला मिळत होती. हा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर देखील मांडला गेल्याने त्यांनी त्या मधील त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले होते. आताच्या घडीला बीएससी(ओनर्स ) कृषी या पदवीशी इतर आठ पदव्या समकक्ष असल्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे, अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र कृषी विभागाचे उपसचिव बा. की. रासकर यांनी या बाबत शासन निर्णय जारी केला आहे. बीएससी(ओनर्स ) कृषी या पदवी ची बाकीच्या आठ पदव्या समतुल्य असल्याचे नमूद केले आहे.
Share your comments