1. शिक्षण

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारची शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, जाणून घेऊया योजनेबद्दल

इतर मागास वर्ग प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीमुळे बाधा येऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू केली जाणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
student

student

इतर मागास वर्ग प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीमुळे बाधा येऊ नये, यासाठी  महाराष्ट्र शासनाने ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू केली जाणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी चारशे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. दरवर्षी सहा कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी केली जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे.

नेमकी काय आहे योजना?

ओबीसी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे, असे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी दहा लाख रुपये, उच्च अभ्यासक्रमासाठी वीस लाख रुपये कर्ज मर्यादेचे तरतूद यामध्ये आहे.

या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जे विद्यार्थी राज्यांतर्गत अभ्यासक्रमामध्ये केंद्र परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खासगी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू असेल. देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर देशातील नामांकित संस्थेत प्रवेश घेते विद्यार्थी पात्र असतील.

तसेच विदेशी अभ्यासक्रमासाठी  QS रँकिंग तसेच गुणवत्ता, पात्रता परीक्षा ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन(GRE) टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज ऑफ फोरेन लांग्वेज (TOEFL) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

 बँकेकडून वितरित केलेल्या रकमेवर 12 टक्के रकमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना मिळेल. यासंबंधीची सविस्तर मार्गदर्शन सूचना लवकरच जारी केला जाणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

English Summary: educational intrest return loan scheme for other backward cast student for higher education Published on: 27 November 2021, 08:50 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters