चारही कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध शाखांमध्ये 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर या प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा 11 ते 13 जून या कालावधीत घेण्यात येणार आहे.
त्यासाठी चे ऑनलाईन अर्ज हे 28 मार्च पर्यंत भरता येणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या परीक्षेसाठी संबंधित विद्या शाखेचे पदवीधर आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षातील पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी पात्र राहणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज हा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या https://www.mcaer.orgया वेबसाईटवर भरायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी माहिती पत्र काळजीपूर्वक वाचणे गरजेचे असल्याचे मंडळाने सांगितलेआहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्ज महाराष्ट्र कृषी विद्यापीठ मंडळ यांच्याकडे पाठवण्याची आवश्यकता नाही.
यामध्ये पात्र व अपात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. जे उमेदवार यामध्ये पात्र ठरतील अशा उमेदवारांचे हॉल तिकीट मंडळाच्या संकेतस्थळावरून 3 जून पासून उपलब्ध होणार आहे. तसेच परीक्षा झाल्यानंतर उत्तराची नमुना पत्रिका 20 जून ला उपलब्ध होईल व परीक्षेचा निकाल 27 जून रोजी संबंधित वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल.
या परीक्षेसंबंधी महत्वाचे दिनांक
- ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत- 28 मार्च
- परीक्षा शुल्क ऑनलाइन भरणे- 31 मार्चपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत
- परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक – 3 जून पासून
- अधिक माहितीसाठी संकेतस्थळ-https://www.mcaer.org
Share your comments