1. शिक्षण

Hsc Exam Update: बारावी परीक्षेचा 5 मार्चचा पेपर 5 एप्रिलला तर 7 मार्चचा पेपर होणार 7 एप्रिलला

राज्यातील येऊ घातलेल्या बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे.पाच मार्चला बारावीचा हिंदी विषयाचा पेपर आता 5 एप्रिलला होणार आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
student at exam hall

student at exam hall

राज्यातील येऊ घातलेल्या बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे.पाच मार्चला बारावीचा हिंदी विषयाचा पेपर आता 5 एप्रिलला होणार आहे.

सात मार्चला होणारा मराठीचा पेपर आता सात एप्रिलला होणार आहे. बारावीची परीक्षा येत्या चार मार्चपासून सुरू होत आहे. हा निर्णय घेण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे संगमनेर येथे बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणारा टेम्पो ला आग लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेमध्ये जवळजवळ मराठी व हिंदी सह पंचवीस प्रकारच्या भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिका होत्या. या घटनेमुळे या प्रश्नपत्रिका आता ओपन झाल्या आहेत. या टेम्पो मध्ये फक्त पुणे विभागाचा प्रश्नपत्रिका होत्या परंतु अन्य आठ विभागांना देखील प्रश्नपत्रिकांचा पुरवठा झाला होता.

त्यामुळे आता संपूर्ण राज्यभरातील प्रश्नपत्रिका बदलाव्या लागणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे विभागाचा विचार केला तर पुणे विभागाला सोळा लाख  प्रश्नपत्रिका लागतात. यापैकी अडीच लाख प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी बोर्डाची परीक्षा 4 मार्च पासून सुरु होणार आहे. चार मार्चला इंग्रजी विषयाचा पेपर असून तो वेळापत्रकाप्रमाणे होईल. 

English Summary: change in hsc board exam timetable of two language paper from board Published on: 25 February 2022, 10:58 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters