आपल्याला माहित आहेच की, भारतामध्ये विविध प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जातात. या सगळ्यांमध्ये जर आपण विचार केला सीबीएसई आणि आयसीएसई यांच्याव्यतिरिक्त संपूर्ण देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्य मंडळाच्या परीक्षांचा जो काही स्तर किवा रचना आहे ती संपूर्ण वेगवेगळी आहे. यामुळे मुलांच्या गुणांमध्ये देखील मोठ्या प्रकारचा फरक पडतो व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व्यवस्थित पद्धतीने केले जात नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारने एक बदल करायचे ठरवले असून त्यासाठी 'पारख' म्हणजेच परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अंड अनालिसिस ऑफ नॉलेज फोर होलिस्टिक डेवलपमेंट या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.या संस्था स्थापन करण्यामागे सरकारचा एक विचार आहे
तो म्हणजे देशभरातील ज्या काही दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होतात यामध्ये समानता आणणे व बारावीच्या व दहावीच्या स्तरावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी एकसमान आराखडा तयार करणे हा होय.
ज्या काही बोर्डाच्या परीक्षा होतात त्या एक समान करण्याचा केंद्र सरकारचा विचार गेल्या काही महिन्यांपासून सुरु असून त्या अनुषंगाने एनसीआरटीने एससीआरटी सोबत अनेक बैठका घेऊन सगळ्या नियोजन करून पारक नावाचे नवीन मूल्यांकन नियामक तयार केले जात आहे.
नक्की वाचा:Education: बारावीनंतर बि.होक पदवी म्हणजे करिअर मधील नामी संधी,वाचा याबद्दल माहिती
Parakh नेमके काय आहे?
ही संस्था एनसीईआरटी चा एक भाग म्हणून काम करणार आहे. नॅशनल अचीवमेंट सर्वे आणि स्टेट अचीवमेंट सर्वे आयोजित करण्याची जबाबदारी देखील या संस्थेची असेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही संस्था राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक प्रमुख भाग असणार आहे व यामध्ये देशातील
सर्व मान्यताप्राप्त शाळांसाठी समान मानके व नियम तसेच मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार असून मूल्यमापनाचा नमुना हा एकविसाव्या शतकात मुलांना आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास आणि मूल्यमापन करता येईल असा ठेवला जाणार आहे..
Share your comments