सी बी एस ई च्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल दहावी, अकरावी व बारावीतील कामगिरीच्या आधारे लागणार आहे. निकालाबाबत स्थापन करण्यात आलेल्या 13 सदस्यीय समितीने आपला अहवाल शुक्रवारी सुप्रीम कोर्टाला सोपविला. सीबीएसई बोर्ड 31 जुलैला निकाल जाहीर करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची निकालाच्या बाबतीत असमाधानकारक मनस्थिती आहे
अशा विद्यार्थ्यांना कोरोना ची परिस्थिती निवडल्यानंतर परीक्षा द्यायची संधी मिळणार आहे. तसेच आय सी एस ई बोर्ड गेल्या सहा वर्षाच्या शैक्षणिक रेकॉर्ड आधारित 30 जुलैपर्यंत निकाल जाहीर करणार आहे. सुप्रीम कोर्टाने या दोन्ही बोर्डांच्या फॉर्म्युला ला तत्त्वतः मान्यता दिली आहे. तसेच त्यावर पक्षकारा कडून सल्ले मागवण्यात आले आहेत. त्यावर 21 जूनला सुनावणी होईल. सुप्रीम कोर्ट ने केंद्राला निकालांची घोषणा व मूल्यांकन पद्धतीवर असमाधानी विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची मुदत जाहीर करण्याचे सांगितले.
सी बी एस ई कडून ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी यांच्या पीठाला सांगितले की, निकाल दहावी, अकरावी व बारावीतील कामगिरीच्या आधारे ठरेल. दहावीतील सर्वाधिक गुण असलेल्या तीन विषयांची निवड होईल. 11 वी च्या सर्व थेरी पेपरचे गुण घेतले जातील. बारावीच्या युनिट टेस्ट, सत्र परीक्षा व प्रॅक्टिकल च्या गुणा द्वारे मूल्यांकन होईल. विविध शाळांमध्ये मूल्यांकन पद्धतीत समानता यावी म्हणून समितीची स्थापना केली जाऊ शकते. प्रत्येक शाळेमध्ये असलेली रिझल्ट कमिटी मूल्यांकनात मदत करेल. एखाद्या विद्यार्थ्याला तीन वर्षातील कामगिरीच्या आधारे योग्य गुण मिळाले नाही तर त्याला कंपार्टमेंट श्रेणी ठेवले जाईल. न्या. खानविलकर म्हणाले बरेच विद्यार्थी या मसुद्याचे सहमत होऊ शकतात आणि बरेचसे नाहीत.
असमाधानी असलेल्यांची संख्या कमी असेल. यामुळे बोर्ड परवाना गाईडलाईन चे पालन करत त्यांच्या परीक्षा लवकरच आयोजित करू शकतो. त्यावर ॲटर्नी जनरल म्हणाले, याचा निर्णय सीबीएस इलाच घेऊ द्यावा. न्या. माहेश्वरी म्हणाले, तुम्ही निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहात. सर्व नियमांचा सी बी एस ई पासिंग स्कीम मध्ये समावेश करावा. जेणेकरून भविष्यात मुलांची अडचण होणार नाही. कोर्ट म्हणाले, निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी एक अंतर्गत यंत्रणा असली पाहिजे. त्यावर वेणू गोपाल म्हणाले की, त्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल.
Share your comments