1. शिक्षण

बायोटेक्नॉलॉजी ठरेल करिअरसाठी एक टर्निंग पॉइंट! जैवतंत्रज्ञान विषयात आवड असलेल्यांना नोकरी आणि उद्योग क्षेत्रात चांगल्या संधी

बायोटेक्नॉलॉजी ही विद्याशाखा अलीकडच्या काळामध्ये जीवशास्त्र विषयांमध्ये या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेली शाखा आहे. यामध्ये सागरी जैवतंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, औद्योगिक जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय जैवतंत्रज्ञान इत्यादी तंत्रज्ञानाचा समावेश होतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
career in biotechnology stream

career in biotechnology stream

बायोटेक्नॉलॉजी ही विद्याशाखा अलीकडच्या काळामध्ये जीवशास्त्र विषयांमध्ये या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेली शाखा आहे. यामध्ये सागरी जैवतंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, औद्योगिक जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय जैवतंत्रज्ञान इत्यादी तंत्रज्ञानाचा समावेश होतो.

ज्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषयांमध्ये रुची आहे असे विद्यार्थी बायोटेक्नॉलॉजी सारख्या शाखेमध्ये चांगले करिअर करू शकतात व त्यांना चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. या लेखामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी मध्ये असलेल्या संधी पाहू.

नक्की वाचा:येणाऱ्या कालावधीत शेतकरी उत्पादक कंपन्यांना सहजरित्या व सुलभ अर्थपुरवठा करणार- केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर

बायोटेक्नॉलॉजीला संधी असलेले विविध क्षेत्रे

 भारतामध्ये बायोटेक्नॉलॉजी च्या विविध क्षेत्रांमधील काम करणाऱ्या कंपन्यांची संख्या ही आठशेच्या वर आहे. यामध्ये बायोटेक सॉफ्टवेअर, औद्योगिक एन्झाइम्स, डेटाबेस सेवा, उपचारात्मक लस व निदान, प्रतिजैविके निर्माण, संशोधन वैद्यकीय चाचण्या, विविध अन्न प्रक्रिया उद्योग, जैविक खते, संकरित बियाणे, जैविक कीटकनाशके, सॉफ्टवेअर अशा विविध क्षेत्रांमध्ये या कंपन्या कार्यरत असून या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना  नवनवीन शिकण्याची आणि नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

तसेच बायोटेक्नॉलॉजी च्या क्षेत्रांमध्ये  एक ट्रेनी म्हणून बीएस्सी किंवा एम एस सी  झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. प्रक्षेत्र भेटी द्वारे बीएससी अथवा एम एस सी झालेली विद्यार्थी खाजगी संस्थांमध्ये नोकरी करू शकतात. एवढेच नाही तर बायोटेक / अप्लाइड लाइफ सायन्स मध्ये मास्टर करणारे विद्यार्थी अध्यापन, रिसर्च तसेच विस्तार क्षेत्रात देखील नोकरी करू शकतात. तसेच बायोटेक्नॉलॉजी मध्ये पदवीत्तर पदवी घेऊन विक्री क्षेत्रांमध्ये देखील नोकरी करता येते. जर तुम्हाला रिसर्चर म्हणून काम करायचे असेल तर पदव्युत्तर पदवी गरजेचे असते. माध्यमिक शाळांमध्ये जैवतंत्रज्ञान पदवीधारक उमेदवार शिक्षकाच्या नोकरीसाठी पात्र ठरणार आहेत.

नक्की वाचा:विजबिल थकबाकीदार ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर- ऊर्जामंत्री नितीन राऊत

 तसेच काही विद्यार्थ्यांनी जर कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून बीटेक अथवा एमटेक केले तर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी सेवेमध्ये देखील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

 बायोटेक्नॉलॉजी मध्ये उच्च शिक्षणाची संधी

 हायर एज्युकेशन साठी भारतात आणि इतर प्रगत देशांमध्ये लाइफ सायन्सेस या शाखेत विशेष प्राधान्य दिसून येते. यासाठी विद्यार्थ्यांनी इंग्लिश साठी काही परीक्षा जसे की, टोफेल, जी आर इ इत्यादी दिल्यास प्रवेश व शिष्यवृत्तीचे संधी देखील उपलब्ध होऊ शकते.

बायोटेक्नॉलॉजी मध्ये बायॉइन्फॉर्मटिक, मायक्रोबायोलॉजी, मॅथ, जेनेटिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इन्व्हरमेंट सायन्स, ॲनिमल बायोटेक इत्यादी अनेक विविध विषयांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवणे आणि रिसर्च सेक्टर  मध्ये काम करणे अधिक सोपे झाले आहे.

( संदर्भ-ॲग्रोवन)

English Summary: biotechnology stream is very crucial and benificial for career oppourtunity its a turning point Published on: 20 March 2022, 10:47 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters