राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड मध्ये रिक्त असलेल्या पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली असून या भरती प्रक्रियेतून विविध पदाच्या एकूण 177 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे.
नाबार्डमध्ये भरती
1- या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख- जे इच्छुक आणि पात्र उमेदवार असतील अशा उमेदवारांना 15 सप्टेंबर 2022 पासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
2- अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक- या भरतीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 10 ऑक्टोबर 2022 हा आहे.
3- या भरतीच्या माध्यमातून भरली जाणारी पदे- या भरती च्या माध्यमातून विकास सहाय्यक- या पदाचे 173 जागा रिक्त असून विकास सहाय्यक( हिंदी)- या पदासाठी चार जागा रिक्त आहेत.
4- लागणारी शैक्षणिक पात्रता- विकास सहाय्यक या पदासाठी उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे तर विकास सहाय्यक( हिंदी) या पदासाठी उमेदवाराने हिंदी आणि इंग्रजी विषय सोबत पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
नक्की वाचा:मोठी बातमी: राज्यात 15 सप्टेंबरपासून जम्बो भरती; या विभागात 78000 पदे भरणार
5- लागणारी वयोमर्यादा- या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक असतील अशा उमेदवाराचे वय कमीत कमी 21 तर जास्तीत जास्त 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
6- परीक्षा शुल्क- या भरतीसाठी कुठल्याही प्रकारच्या शुल्कची गरज नाही.
7- नोकरीचे ठिकाण-या भरतीत निवड झाल्यास भारतामध्ये कुठेही नियुक्ती केली जाऊ शकते.
8- इतकी मिळेल पगार- विकास सहाय्यक या पदासाठी 13150 ते 34 हजार 990 रुपये प्रतिमाह तर विकास सहाय्यक( हिंदी) या पदासाठी 13150 ते 34 हजार 990 रुपये प्रतिमाह इतके वेतन असेल.
9- अधिक माहितीसाठी संपर्क-www.nabard.org या संकेतस्थळावर अधिकची माहिती आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.
नक्की वाचा:Education: बारावीनंतर बि.होक पदवी म्हणजे करिअर मधील नामी संधी,वाचा याबद्दल माहिती
Share your comments