सध्या विविध प्रकारच्या नोकरीच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात निघत असून नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांसाठी खूप मोठ्या सुवर्णसंधी चालून येत आहे. बरेच विद्यार्थी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, बँकेच्या परीक्षांची तयारी करीत असतात.
अशा बँकेच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी असून देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदासाठी भरतीची नोटीफिकेशन जारी करण्यात आली आहे. या लेखामध्ये आपण या भरती विषयी माहिती घेऊ.
स्टेट बँकेमध्ये भरती
1- एकूण रिक्त पदे- स्टेट बँकेमार्फत घेण्यात येणारी ही भरती मध्ये एकूण 1673 पदे भरली जाणार आहेत.
2- शैक्षणिक पात्रता- ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल अशा सर्व उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शैक्षणिक संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
3- पदाचे नाव- स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मार्फत घेण्यात येणारी ही भरती प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी घेण्यात येणार आहे.
4- लागणारी वयोमर्यादा- ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल अशा उमेदवारांचे वय हे कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त तीस वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे जे उमेदवार राखीव प्रवर्गातील असतील अशांना सरकारी नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे.
5- या भरतीत निवड कशी होईल?- या भरती मधील निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांना पूर्वपरीक्षा अर्थात प्रीलिम्स,मुख्य परीक्षा आणि सायकॉमेट्रिक चाचणी या तीन टप्प्यांचा प्रक्रियेतून जावे लागणार आहे.
6- या भरती संबंधी महत्त्वाच्या तारखा- ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल ते 22 सप्टेंबर 2022 पासून करू शकतात व या भरतीसाठीची अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.
नक्की वाचा:Bank Job: सुवर्णसंधी! 'या' बँकेमध्ये आहे विवीध पदांची भरती, वाचा सविस्तर माहिती
7- या भरतीसाठी असलेल्या परीक्षेची तारीख- या भरतीसाठी घेण्यात येणारी प्रीलिम्स परीक्षाही 17,18,19 आणि 20 डिसेंबर रोजी होणार असून मुख्य परीक्षा 2023 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यात होण्याची शक्यता असून या परीक्षेचा निकाल मार्च 2023 पर्यंत डिक्लेअर होईल.
8- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे- दहावी आणि बारावी तसेच इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट ( उमेदवार मागासवर्गीय असतील तर), ओळखपत्रासाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट साईज फोटो हे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
9- अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ-sbi.co.in या संकेतस्थळाला अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार भेट देऊ शकतात.अधिकच्या माहितीसाठी या भरती संबंधीची नोटिफिकेशन उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
Share your comments