1. शिक्षण

लागा तयारीला!सैन्यदलात भरती ची संधी, 24 जानेवारीपासून करू शकतात ऑनलाईन अर्ज

सध्या कोरोनामुळे गेल्या वर्षापासून या प्रकारच्या भरतीप्रक्रिया थांबल्या होत्या. सैन्य भरती चा विचार केला तर शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील तरुण सैन्य भरतीची तयारी फार मोठ्या प्रमाणात केली जाते

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
soldier

soldier

सध्या कोरोनामुळे गेल्या वर्षापासून या प्रकारच्या भरतीप्रक्रिया थांबल्या होत्या. सैन्य भरती चा विचार केला तर  शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील तरुण सैन्य भरतीची तयारी फार मोठ्या प्रमाणात केली जाते

त्यामुळे हे तयारी करणारे तरुण चातकासारखी भरतीची वाट पाहत आहेत.अशा तरुणांसाठी एक खुशखबर आहे. 24 जानेवारीपासून सैन्य भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्याविद्यार्थ्यांनी इयत्ता बारावी विज्ञान परीक्षेत 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या भरती परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.विद्यार्थ्यांनी गणित,फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयात 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण हवे आहेत.

तसेच उमेदवाराने जेईई मेन्स परीक्षा पास होणे बंधनकारक आहे. या भरतीसाठी साडे सोळा ते साडे एकोणीस वर्षापर्यंतच्या उमेदवाराच अर्ज करू शकतात.ज्याइच्छुक उमेदवारांना सध्या अर्ज करायचा असेल असे उमेदवार भारतीय सैन्य दलाचे संकेतस्थळ www.joinindianarmy.nic.inवर अर्ज करू शकतात. या केलेल्या उमेदवारांमधून मुलाखतीसाठी काही उमेदवारांची निवड करण्यात येईल.

SSB इंटरव्यू

 एसएसबी इंटर्व्ह्यू दोन टप्प्यातील प्रक्रिया असून पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाचदुसऱ्या टप्प्यात प्रवेश देण्यात येईल.त्यानंतर वैद्यकीय चाचणी परीक्षा होणार आहे.हे सगळं भरतीच्या टप्पे पार केल्या नंतरच गुणांच्या आधारे निवड यादीत असलेल्या युवकांना ट्रेनिंगसाठी बोलावण्यात येईल.

English Summary: army recruitment online application will start from 24 january Published on: 22 January 2022, 07:36 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters