अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Thursday, 13 September 2018 04:35 PM


केंद्र शासन पुरस्कृत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी केले आहे.

मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन या अल्पसंख्याक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनामार्फत मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना आहे. सन 2018-19  साठी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी नवीन शिष्यवृत्ती आणि शिष्यवृत्तीच्या नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करावेत.

संबंधित बातमी वाचण्यासाठी: प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी www.dhepune.gov.in आणि www.jdhemumbai.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 022-22656600 या दूरध्वनी क्रंमाकावर संपर्क साधता येईल.

विद्यार्थ्यांनी www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30सप्टेंबर 2018 आहे. सदर योजनेसाठी विद्यार्थ्यांनी National Scholarship Portal वरील मार्गदर्शक सूचना आणि Frequently Asked Questions वाचून दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज करावेत.

scholarship minority students online शिष्यवृत्ती अल्पसंख्याक विद्यार्थी ऑनलाईन योजना scheme
English Summary: appeal to apply for scholarship scheme for minority students

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.