दहावीनंतर काय? हा बहुतांशी प्रश्न पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडत असतो.पांडू विद्यार्थी दहावी नंतर अकरावीला प्रवेश घेतात.काही विद्यार्थी विज्ञान शाखा तर काही वाणिज्य शाखा कडे वळतात. यावर्षी आपण पाहिलेत की दहावी मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार केला तर शेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचा कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा व मार्गदर्शक ठरू शकतो. त्या लेखात आपण कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेऊ.
कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाचे स्वरूप
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्यामार्फत कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम चालवला जातो.दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना शेतीच्या संबंधित सर्व शिक्षण मिळावंयासाठी हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार बाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी तसेच राज्य सरकारांना प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावा, या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम चालवला जातो.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे एकूण 9 केंद्र आणि 76 कृषी प्रशिक्षण शाळा असून याच्या मार्फतहा अभ्यासक्रम विद्यापीठ कार्यक्षेत्रात चालवला जातो. यातील प्रत्येक चंद्राची प्रवेशक्षमता ही साठ इतकी असते.जिल्ह्यानुसार गुणवत्ता यादी द्वारे प्रवेश दिले जातात. प्रति वर्षी एकूण पाच हजार पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असतात.
हा अभ्यासक्रमदोन वर्षाचा असून पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात कृषी मुलतत्वे, प्रमुख पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान,फळे व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान, कृषी अवजारे व यंत्रे तसेच आधुनिक सिंचन पद्धती,पीकसंरक्षण, ग्रामीण समाजशास्त्र व कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान असा एकूण एक हजार शंभर गुणांचा अभ्यासक्रम असतो. यामध्ये 550 गुण लेखी परीक्षा आणि 550 गुण प्रॅक्टिकल ला असतात.
या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षी सहकार पतपुरवठा व पणन, बीजोत्पादन तंत्रज्ञान, रोपवाटिका व्यवस्थापन, फुलशेती व हरितगृह तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग,शेतमाल प्रक्रिया, सेंद्रिय शेती कृषी आधारित उद्योग यामध्ये प्रात्यक्षिक आणि लेखी असे एकूण एक हजार दोनशे गुण असतात. दुसऱ्या वर्षी प्रॅक्टिकल परीक्षेला 850 तर लेखी परीक्षेला 350 गुण निश्चित असतात.
कृषी तंत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया…
कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रिया साधारणपणे जुलै ते सप्टेंबर या दरम्यान राबवली जाते.त्यासाठी दहावी उत्तीर्ण असण्याची अट आहे. यासाठी शासकीय संस्थेत प्रवेश घेतल्यास दोन वर्षाची फी साधारणपणे 40 हजारांच्या जवळपास असते तर खासगी संस्थेचे प्रवेशशुल्क 60000 असू शकते.
Share your comments