MFOI 2024 Road Show
  1. शिक्षण

यावर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल अकरावीत प्रवेश

यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या व सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे अकरावीच्या वर्गात जागा कमी पडतील की काय अशी भिती प्रत्येकाच्या मनात होती.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
eleven admission

eleven admission

 यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या व सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे अकरावीच्या वर्गात जागा कमी पडतील की काय अशी भिती प्रत्येकाच्या मनात होती.

 परंतु राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या उपलब्धतेचा विचार केला तर हे प्रमाण जवळजवळ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पेक्षा 35 टक्के जागा अधिक आहेत. त्यामुळे दहावी मध्ये सगळे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरी प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावीला हमखास प्रवेश मिळेल.

परंतु यामध्ये पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी सीईटी चे मार्क महत्वाचे ठरतील. या अकरावी प्रवेश याबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मागेल त्याला महाविद्यालय या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात जागा असून सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यावर बऱ्याच जागा शिल्लक राहतील. शालेय शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार राज्याच्या सहा विभागात 2020 ते 21 मध्ये अकरावीच्या पाच लाख 59 हजार 344 जागा होत्या. चार लाख 49 हजार 55 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले. तीन लाख 78 हजार 861 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यानुसार म्हणजे जवळजवळ 32 टक्के जागा रिक्त होत्या.

 शासनाच्या मागेल त्याला शाळा या धोरणामुळे अकरावीचे वर्ग वाढले आहेत. त्यामुळे अकरावीला जागांचा प्रश्न येतच नाही. त्यामुळे यंदा सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सगळ्यांना अकरावी प्रवेश मिळेल जागांचे अडचण येणार नाही.

 

 सीईटीच्या गुणांवर ठरणार महाविद्यालय

 यावर्षी अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्यांना जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 100 मार्कांचे सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाईल. ऑफलाइन असणारी ही परीक्षा ऐच्छिक असेल. इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. सीईटीच्या मार्कांच्या  च्या आधारावर आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. उरलेल्या जागांवर सीईटी न देणाऱ्या प्रवेश मिळेल.

 माहिती स्त्रोत – दिव्य मराठी

English Summary: admission of eleven standard Published on: 09 July 2021, 07:48 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters