कृषी पदवी प्रवेशासाठी राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घेत प्रवेश निकषांचा आढावा देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आता कृषी प्रवेशासाठी सीईटी प्रमाणेच बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
प्रवेश प्रक्रिया निकषांचा आढावा घेण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण व संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, महात्मा फुलेराहुरी कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांचाही या समितीत समावेश आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील व्यवसायिक अभ्यासक्रम व कृषी अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाते. आधी कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश केवळ बारावीच्या गुणांवर आधारित केले जात होते. परंतु नवीन धोरणानुसार 2018 ते 19 पासून सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीचे 70 टक्के, तर बारावीची 30 टक्के गुण ग्राह्य धरले जातात. 2019-20 आणि 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून पूर्णतः सीईटीच्या गुणांवर प्रवेश देण्याची पद्धत राज्य शासनाने स्वीकारली.
अर्थातच त्यामुळे बारावीच्या गुणांचे महत्त्व संपुष्टात आले आहे. मात्र यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे फेकला जात आहे. ग्रामीण भागात ट्युशन सारखी सोय नसल्याने सिइटीच्या तयारीसाठी लागणाऱ्या कौशल्यात ग्रामीण भागातील तरुण मागे पडतो. त्यामुळे कृषी च्या प्रवेश निकषांचा आढावा घेण्याचे मत उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे आता समिती स्थापन करून त्यामध्ये फेर बदल केले जातील अशी माहिती सूत्रांनी दिली.
Share your comments