यामाहा कंपनी बद्धल तुम्ही ऐकून च असाल जे की जगातील फेमस कंपनीमध्ये यामाहा या कंपनीचे नाव ऐकायला भेटते. अगदी विविध प्रकारच्या यामाहा च्या गाड्या बाजारात उपलब्ध आहेत. अगदी स्पोर्ट बाईक घ्यायची म्हणले की लोकांची नजर हे यामाहा च्या गाडीकडे च जाते. त्यामुळे जास्तीत जास्त यामाहा च्या गाड्यांचा सेल बाजारात होत असतो आणि दरवर्षी यामाहा आपल्या गाडीमध्ये नवीन नवीन फीचर्स घेऊन येतच असते.
यामाहा ची नवीन इथनॉल वर चालणारी मोटारसायकल :-
अगदी काही क्षण च झाले असतील यामाहा ने आपल्या कंपनीची पेट्रोल आणि इथेनॉल या इंधनावर चालणारी मोटारसायकल ब्राझील च्या बाजारपेठेत सादर केलेली आहे. या मोटारसायकल चे नाव यामाहा फझर एफझेड १५ असे असून ही मोटारसायकल ब्राझील च्या बाजारपेठेत विकली जाणार आहे. भारतामध्ये अगदी यामाहा ची गाडी लाँच झाली की लोकांची गर्दी उठते बुकिंग करण्यासाठी. मात्र यामाहा फझर एफझेड १५ ही मोटारसायकल भारतामध्ये कधी येणार आहे हे निश्चित झाले नाही. मात्र येईल या काही दिवसांमध्ये भारताच्या बाजारपेठेत यामाहा एफझेड व्ही ३ या नावाने दाखल होणार असल्याचा अंदाज बांधला गेला आहे.
हेही वाचा:-घ्या जाणून जीप कंपास च्या नवीन इडिशन चे फीचर्स, किमतीमध्ये केली मोठ्या प्रमाणात वाढ
भारतामध्ये असेल एवढी किंमत :-
२०२३ मध्ये यामाहा ची ही मोटारसायकल भारतात येऊ शकते. भारतामधील सध्याच्या मोटारसायकल चा सर्व अभ्यास करून ही गाडी भारतात आणन्याचा विचार यामाहा कंपनीने केलेला आहे. ही गाडी १४९ सीसी इंजिन पेट्रोल किंवा इथेनॉल वर चालणार आहे. जर या गाडीची किंमत भारतीय चलनामध्ये बघायला गेली तर २.६९ लाख अवधी असेल.
केंद्र सरकारचे कंपन्यांना प्रोस्थाहन :-
मागील महिन्यापासून केंद्र सरकारने पेट्रोल तसेच इथेनॉल वर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन दिले आहे जे की जगभरातील कंपन्यांना सुद्धा फ्लेक्स इंजिन तयार करण्यासाठी प्रोस्थाहन दिले जात आहे. अनेक कंपन्या या इंजिनाची निर्मिती करण्याकडे लक्ष घालत आहेत. एवढेच नाही तर मारुती सुझुकी ने सुद्धा या इंजिनासाठी प्राधान्य दिले आहे. २०२३ च्या एप्रिल महिन्यापर्यंत हे इंजिन तयार होईल असे सांगण्यात आले आहे.
Share your comments