अनेकांचे स्वप्न असते की, आपली एक स्वतःची कार असावी, घर असावे. मात्र हे स्वप्न सगळ्यांचेच पूर्ण होत नाही. अनेकजण वेगवेगळ्या कारचे चाहते असतात. सध्या मार्केटमध्ये अनेक कार आल्या आहेत. आपल्याला नवी कार (New Car) घ्यायची असेल तर आपण त्याबाबत अनेक ठिकाणी विचारपूस करतो. अनेक कंपन्या बघतो. आता तुम्हाला कार घ्यायची असल्यास ही बातमी तुम्हाला फायदेशीर ठेऊ शकते.
याचे कारण म्हणजे मारुतीची अशीच एक कार ग्राहकांची खासमखास ठरली आहे. त्या कारची बुकिंगही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे या कारची चर्चा सुरू आहे. या कारचे नाव
नवीन ब्रेझा (Brezza) असे आहे. यामध्ये LXi, VXi, ZXi आणि ZXi+ हे प्रकार असून ते अगदी नवीन 15L K15C पेट्रोल इंजिनद्वारे अद्ययावत आहे. 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली गॅसोलीन मोटर 103bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क वितरीत करते.
तसेच SUV चे मायलेज मॅन्युअल सह 20.15kmpl आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटसह 19.80kmpl आहे. यामध्ये काही महिन्यांत Brezza CNG लाँच येण्याचही बोलले जात आहे. त्यामुळे तुम्हाला तोही पर्याय मिळू शकतो. यामुळे ही कार फायदेशीर आहे. यामध्ये हेड-अप डिस्प्ले वैशिष्ट्यीकृत करणारी Brezza ही त्याच्या विभागातील पहिली कॉम्पॅक्ट SUV बनली आहे. यामुळे पहिल्यापेक्षा जास्त फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.
मोदी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 5 टक्क्यांनी वाढवले, सोन्याच्या किमती वाढणार...
यामध्ये स्क्रीन ड्रायव्हरच्या समोरील डॅशबोर्डवर फिक्स केलेली आहे. या स्क्रीनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामुळे ड्रायव्हरला नेव्हिगेशन सोपे होणार आहे. 360-डिग्री कॅमेरा, सर्व-नवीन हॉट ब्रेझा बलेनो प्रमाणेच 360-डिग्री कॅमेरा स्पोर्ट्स करतो. हा कॅमेरा अतिशय उच्च तंत्रज्ञानाचा आहे. कारच्या आत बसून तुम्हाला कारच्या आजूबाजूचे दृश्य स्क्रीनवर पाहता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
गुवाहाटीत हॉटेलमध्ये आमदारांचा खर्च नेमका झाला तरी किती, डोळे पांढरे करणारी आकडेवारी आली समोर..
शरद पवारांना मोठा धक्का! सरकार बदलताच पवार अध्यक्ष असलेली परिषद बरखास्त
जाता जाता महाविकास आघाडी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकरी खुश..
Share your comments