घरापुढे चार चाकी असणे हे सगळ्यांच्या स्वप्न असतं. त्यासाठी बरेच जण प्रयत्नदेखील करीत असतात. अशाच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वाहन कंपन्या बऱ्याच प्रकारच्या आकर्षक डिस्काउंट ऑफर आणत असतात व अशा ऑफरचा बरेच जण लाभ देखील घेतात.
अशीच आकर्षक डिस्काउंट ऑफर मारुती या कंपनीने ग्राहकांसाठी जून साठी आणली असून जर तुम्हाला कार घ्यायचे असेल तर हा महिना तुमच्यासाठी खास फायद्याचा ठरू शकतो. जूनमध्ये मारुतीने तिच्या वेगवेगळ्या मॉडेलवर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर सादर केले आहे. या सगळ्या ऑफर चे माहिती आपण या लेखात घेऊ.
मारुतीच्या मॉडेलनिहाय सूट
1- मारुती सियाझ- जर तुम्हाला मारुतीच्या सियाज ही कार घ्यायचे असेल तर तुम्ही या महिन्यात बुकिंग करुन 30 हजार रुपयांपर्यंत तुमच्या पैशांमध्ये बचत करू शकतात.
म्हणजेच या मॉडेलवर तुम्हाला 25 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि पाच हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळेल. परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मारुती या मॉडेलवर कॅश डिस्काउंट देत नाहीये.
2- मारुती एस क्रॉस- जर तुम्ही मारूतीची s-cross खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या मॉडेलवर 42 हजार रुपयांपर्यंतचे घसघशीत बचत करू शकतात.
या कारवर तुम्हाला बारा हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 25 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि पाच हजार रुपयांचा कार्पोरेट डिस्काउंट मिळेल.
नक्की वाचा:काय सांगता! 50 हजारात घरी आणा मारुती अल्टो 800 कार, जाणून घ्या या ऑफरविषयी
3- मारुती अल्टो 800- जर तुम्हाला मारुतीचे अल्टो 800 एसी पेट्रोल मॉडेल घ्यायचे असेल तर यामध्ये तुम्हाला 25 हजार रुपयांपर्यंतची सूट दिली जात असून यामध्ये तुम्ही दहा हजार रुपयांचा रोख सूट आणि पंधरा हजार रुपयांचाएक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.
4- मारुती इक्को- जून महिन्यात मारुती ईको च्या पेट्रोल मॉडेल वर वीस हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात असून तुम्हाला दहा हजार रुपयांची रोख सूट आणि दहा हजार रुपयांची एक्सचेंज बोनस सुट मिळेल. परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही ऑफर इकोच्या ॲम्बुलन्स मॉडेलवर उपलब्ध नाही.
5- मारुती सेलेरिओ- मारुतीच्या पेट्रोल मॉडेल वर 30 हजार रुपयांची सूट मिळत असून या 30000 मध्ये 15 हजार रुपयांचे रोख सूट आणि पंधरा हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.
6- मारुती वॅगन आर R 1.0- या मारुतीच्या पेट्रोल मॉडेलवर 35 हजार रुपयांचे सूट दिली असून या पस्तीस हजार रुपयांमध्ये वीस हजार रुपयांची रोख सूट आणि पंधरा हजार रुपयांची एक्सचेंज बोनस सूट समाविष्ट करण्यात आली आहे.
नक्की वाचा:3 लाखात खरेदी करा Hyundai i20 Sportz कार, जाणुन घ्या डिटेल्स
Share your comments