प्रत्येकाला नवीन कार घेण्याची इच्छा असते. परंतु कमी आर्थिक बजेट मुळे बरेच जण नवीन कार खरेदी करू शकत नसाल तर वापरलेले वाहन म्हणजे सेकंड हॅन्ड कार खरेदी करणे हा एक चांगला पर्याय अशा व्यक्तींकडे असू शकतो. परंतु सेकंड हॅन्ड कार विकत घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागणार नाही. त्यामुळे या लेखात आपण काही सोप्या टीप्स पाहू, ज्याचा तुम्हाला सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना खूप उपयोग होईल.
सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना वापरायचे टिप्स
1- कारची स्थिती तपासणे-कार मध्ये कोणतेही मोठे दोष नसावेत.जर ती वापरण्यास योग्य नसेल तर अशी कार खरेदी करण्यात काही अर्थ नाही.
कारचे ब्रेक, स्मोक, इंजिन कुलिंग,स्टीअरिंग, सस्पेन्शन आणि लाइटिंग या सर्व यंत्रणा चांगल्या कामाच्या स्थितीत आहेत, याची खात्री करण्यासाठी बराच वेळ घेणे महत्त्वाचे आहे.
यामुळे तुमचा दीर्घकाळ मेंटेनन्सचा बराच खर्च वाचू शकतो. काहीही फॉल्ट असल्यास दुसरी कार शोधण्यास आणि दुसरा डीलरकडे जाण्याचा अजिबात संकोच करू नका.
2- कारचे बारकाईने परीक्षण-
कारच्या बॉडी मध्ये गंज आहे का ते काळजीपूर्वक तपासा. तसेच वाहनात अनावश्यक वायरिंग आहे का ते देखील तपासा. तसेच कारचे सर्व फीचर्स व्यवस्थित काम करत आहेत की नाही ते देखील तपासणे गरजेचे आहे.
3-बॉडी, अंडर बॉडी आणि चाकांची तपासणी-कार कोणत्याही मोटार अपघाताला बळी पडली आहे का? ते तपासण्यासाठी तुम्ही कारच्या बॉडी वर्कची कसून तपासणी केली पाहिजे. यामध्ये चिप्प केलेले पेंट, डेन्ट्स,फेंडर बेंडर्स, गंज आणि इतर दोष तपासा.
चाकांची नीट तपासणी करा आणि त्यांना बदलण्याची गरज आहे की नाही ते देखील बघा. सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना त्याची इंजिन नक्की तपासा.
कारण इंजिन मध्ये काही समस्या निर्माण झाल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल आणि पुन्हा गाडीत पैसे टाकत राहावे लागेल. हा त्रास टाळण्यासाठी वाहन खरेदी करताना परिचित व्यक्ती किंवा अनुभवी मेकॅनिक सोबत घ्या. जेणेकरून तुम्हाला इंजिनची योग्य माहिती मिळू शकेल.
नक्की वाचा:खरं काय! फक्त 80 हजारात खरेदी करता येणार मारुती अल्टो सीएनजी, ऑफर समजून घ्या
4- इंजिन ऑइल तपासायला विसरू नका- वापरलेली कार खरेदी करताना त्यात इंजिन ऑइल आहे की नाही याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. कार खरेदी करताना इंजिन ऑइल आहे की नाही हे तपासत नाही.
अशा परिस्थितीत जर तुम्ही वाहन लांब अंतरापर्यंत चालवायला जात असाल आणि त्यात इंजिन ऑइल असेल तर वाहनाची इंजिन लॉक होण्याची शक्यता असते.म्हणून इंजिन ऑइल तपासणे गरजेचे आहे.
5- आतील बाजूचे निरीक्षण- कारची आतील बाजू नीट पहा कारण कारचा आतील भाग जळलेला आहे का किंवा सिगारेट वगैरे मुळे काही जळण्याची काही चिन्हे आहेत का हेदेखील पाहणे गरजेचे आहे.
या गोष्टी आढळल्यास, कार मधून काही पैसे कमी करण्यासाठी आपल्याला कारणे मिळू शकतात. स्टिरिओ, एसी युनीट आणि विंडोज तपासणे गरजेचे आहे. तसेच गाडीचा मायलेज रीडिंग देखील पहा. त्यामुळे आतील भागाचे नीट परीक्षण करणे गरजेचे आहे.
6- कारची टेस्ट ड्राईव्ह- सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्याचा सौदा करण्यापूर्वी कार चालवून पाहणे खूप महत्त्वाचे आहे. सुमारे वीस मिनिटे कार वेगवेगळ्या वेगाने चालवा. त्यामुळे कार खरोखरच चांगल्या स्थितीत आहे का आहे तपासण्यात तुम्हाला मदत होईल.
नक्की वाचा:50 हजारात घ्या 'या' पावरफुल सेकंड हँड बाईक्स, मिळतील या ठिकाणी, वाचा सविस्तर माहिती
Share your comments