कारमध्ये विविध प्रकारचे मॉडेल्स आहेत. जर आपण कारच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक जणाच्या वेगवेगळ्या अपेक्षा आणि आवड असते. यामध्ये सनरूफ असलेल्या कार बऱ्याच कुटुंबांना आवडतात कारण लांब अंतराचा सहलीला जाण्यासाठी या कार खूप मजेशीर व आरामदायी असतात. बऱ्याच जणांना परवडणाऱ्या किमतीत सनरूफ कार घेण्याची इच्छा असते. या लेखात आपण अशाच काही परवडणाऱ्या किमतीत मिळणारे सनरूफ कारबद्दल माहिती घेऊ.
भारतातील सर्वात स्वस्त सनरूफ कार
1- टाटा नेक्सॉन- टाटा नेक्सन सारख्या एसयूव्ही मध्ये देखील अनेक कार निर्माता कंपन्या सनरूफ वैशिष्टे प्रदान करतात. हा पर्याय या एसयूव्हीच्या एक्सएम एस प्रकारात उपलब्ध आहे.
2- होंडा JAZZ- या कारच्या टॉप व्हेरीयन्ट मध्ये सनरूफचे वैशिष्ट दिले आहे. या कारची किंमत नऊ लाख 34 हजार रुपये एक्स शोरूम आहे. या कारचे टॉप व्हेरिएंट ZX हे आहे.
3- होंडा डब्ल्यूआरव्ही- होंडा कंपनीच्या एकमेव डब्ल्यूआरव्ही मध्ये सनरूफ हे वैशिष्ट्ये देण्यात आले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 89 हजार रुपये आहे. ही सुविधा या कारच्या टॉप व्हेरिएंट VX मध्ये देखील उपलब्ध आहे.
4- महिंद्रा एक्सयुव्ही 300- दहा लाख रुपये एक्स शोरूम किमतीसह येणाऱ्या महिंद्रा एक्सयुव्ही 300 मध्ये देखील सनरूफ वैशिष्ट्ये मिळेल. हे वैशिष्ट्य या सब कंपॅक्ट एसयूव्हीच्या W-6 आणि वरील प्रकारांमध्ये उपलब्ध आहे ज्याची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते.
5- मारुती ब्रेझा- मारुती कंपनीच्या मारुती ब्रेझा या कारला देखील हे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. यामध्ये ZXi आणि ZXi प्लस मध्ये हा पर्याय उपलब्ध आहे. याची एक्स शोरूम किंमत बारा लाख 30 हजार रुपयांपासून सुरू होते.
नक्की वाचा:खुशखबर! मारुती सुझूकी 'या' चार कार खरेदीवर देतेय तब्बल 50 हजारापर्यंत सूट
Share your comments