
ertiga car
कार घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.परंतु कार घेताना आपल्याला आपला आर्थिक बजेट आणि आपल्या फॅमिली मेंबर यांचा सगळ्यात आगोदर प्राधान्याने विचार करावा लागतो. तसेच तुम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हलसाठी कार खरेदी करायचे आहे की फॅमिलीसाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करून कार कोणती किंवा किती सीटर घ्यायची हे आपण ठरवत असतो.
परंतु बरेच जण कुटुंब थोडे मोठे असेल तर 7 सीटर कार घेणे पसंत करतात. याच पार्श्वभूमीवर आपण या लेखामध्ये काही पाच ते दहा लाखाच्या आतल्या सात सीटर कारची माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:टाटा ची ब्लॅकबर्डचे लवकरच होतेय मार्केट मध्ये पदार्पण, जाणून घ्या या कार चे आकर्षक फीचर्स
महत्त्वाच्या 7 सीटर कार
1- मारुती एरटिगा- ही मारुती सुझुकी कंपनीची कार असून एक चांगली कौटुंबिक कार आहे. या7 सीटर कारची एक्स शोरूम किंमतीचा विचार केला तर ती आठ लाख 41 हजार रुपये आहे.
या कारचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला पेट्रोल आणि सीएनजी असे दोन्ही पर्याय मिळतात. एक किलो सीएनजी मध्ये ही कार 26 किलोमिटर मायलेज देते. जर आपण पेट्रोलचा विचार केला तर 1 लिटर पेट्रोलमध्ये 20.51 किमी मायलेज आहे.
नक्की वाचा:CNG Cars: संधीच करा सोनं! या वेबसाइटवर मिळतायेत सर्वात स्वस्त सीएनजी कार...
2- महिंद्रा बोलेरो नियो- बोलेरो नियो ही एक चांगली 7 सीटर कार आहे. ही कार फॅमिली साठी उत्तम असून या गाडीची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 29 हजार रुपये आहे. हे कार पाच रंगांमध्ये येते. या कारमध्ये फ्रंट आणि रियर पावर विंडो, प्रशस्त बुट स्पेस, पावरफूल एसी,17.8 सेमी टच स्क्रीन इन्फॉटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल तसेच रिव्हर्स पार्किंग सेंसर, ऑटोमॅटिक डोअर लॉक, एअर बॅग इत्यादी चांगले वैशिष्ट्य आहेत.
3- रेनॉल्ट ट्रायबर- एक भारतातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार असून या गाडीची किंमत 5 लाख 91 हजार रुपयांच्या प्रारंभिक एक्स शोरूम किमतीसह कार चार स्टार रेटिंग आहे. या कारमध्ये 999 सीसीचे पेट्रोल इंजिन असून ही फॅमिलीसाठी एक सर्वोत्तम 7 सीटर कार आहे.
Share your comments