350cc सेगमेंट मधील रॉयल एनफिल्डची सर्वात कॉम्पॅक्ट असलेली बाईक भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफिल्ड 'हंटर 350' लॉंच करण्यात आली. या बाईकची एकंदरीत डिझाईन आणि स्टाइल रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि रॉयल एनफिल्ड मेटिओर पेक्षा खूपच प्रीमियम आणि आक्रमक आहे. या बाईकचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही, रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 पेक्षा वजनाने चक्क 14 किलो कमी आहे.
तसेच या बाईकमध्ये युएसबी पोर्ट असून तुम्ही बाईक चालवत असताना देखील तुम्हाला तुमचा मोबाईल चार्ज करता येणार आहे.
या बाइकची वैशिष्ट्ये
भारतीय बाजारपेठेमध्ये ही बाईक तीन प्रकारात आली असून त्यामध्ये रेट्रो, फॅक्टरी, मेट्रो डॅपर आणि मेट्रो रिबेल यांचा समावेश आहे. त्याचप्रकारे काय रंगात Haier प्रकारांमध्ये 17 इंच चाके उपलब्ध असून मेट्रो प्रकारात सहा रंगाचे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच रेट्रो प्रकारात दोन रंग पर्याय उपलब्ध आहेत.
यामधील मेट्रो प्रकारात व्हील बेस क्लासिक पेक्षा 20 मिमि आणि मीटीओर पेक्षा 30 मीमी लहान आहे. तिचे कर्ब वजन 180 किलो आहे. मेट्रो व्हेरिएंटमध्ये डुएल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. तसेच सिक्युरिटीसाठी डुएल चैनल एबीएस उपलब्ध आहे.
नक्की वाचा:Bike News: शेतकरी राजांची आवडती सुपर स्प्लेंडर आता नवीन अवतारात लॉन्च, जाणून घ्या किंमत
त्याचवेळी रेट्रो प्रकारात पुढच्या बाजूस डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूस ड्रम ब्रेक मिळेल. तसेच सुरक्षा साठी सिंगल चैनल एबीएस उपलब्ध असणार आहे. या बाईक मध्ये पावर साठी 349 सीसीजे इंजिन असून त्याचे इंजिन 6100 rpm वर 20.2 bhp ची किंमत कमाल पावर आणि 4000 rpm वर 27 एनम पिक टॉर्क जनरेट करते.
प्रकारानुसार या बाईकची किंमत
1- रॉयल एनफिल्ड हंटर रेट्रो फॅक्टरी- किंमत- एक लाख 49 हजार 900 रुपये
2- रॉयल एनफिल्ड हंटर मेट्रो डॅपर- किंमत- एक लाख 63 हजार 900 रुपये
3- रॉयल एनफिल्ड हंटर मेट्रो रेबल- किंमत- एक लाख 68 हजार 900 रुपये
Share your comments