आपण सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे वाहने वापरणे पाहिजे तेवढे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे आपण पाहत आहोत की मागील वर्षापासून इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढताना दिसून येत आहे. विविध प्रकारच्या दुचाकी तसेच चारचाकी वाहन आता इलेक्ट्रिक व्हेरिएंट मध्ये लॉन्च होताहेत. याच पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सने लोकप्रिय हॅचबॅक टाटा टियागो या कारचे ईव्ही व्हेरिएंट लॉंच केले.
या कारचे वैशिष्ट्ये
टाटा टियागो देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असून या इव्हीला एका चार्जमध्ये तीनशे पंधरा किलोमीटरची रेंज मिळेल. टाटा टियागो ही ईव्ही सेगमेंट मधील भारताची पहिली प्रिमियम हॅचबॅक बनली आहे. टीयागो बॅटरीला डीसी फास्ट चार्जरने 80 टक्के चार्ज करायचे असेल तर अवघ्या 57 मिनिटे लागतात.
कारमध्ये आठ स्पीकर सिस्टम,रेन सेन्सिंग वायफर, पुश बटन स्टार्ट/ स्टॉप, इलेक्ट्रिक ओआरव्हीएम,क्रूझ कंट्रोल आणि बरेच वैशिष्ट्य देण्यात आले आहे.
टीयागो ईव्ही हे भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे. यावर एक लाख 60 हजार किमी पर्यंत बॅटरी आणि मोटर वारंटी देखील आहे. या कारमध्ये दोन ड्रायविंग मोड उपलब्ध आहेत.
बुकिंग केव्हापासून सुरू होईल?
या कारची बुकिंग 10 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार असून वितरण हे जानेवारी 2023 पासून होणार आहे.
या कारची किंमत
टाटा टियागोचे इव्ही व्हेरिएंट आठ लाख 49 हजार रुपयाच्या सुरुवातीच्या किमतीत मिळणार आहे.
नक्की वाचा:Car News: मारुतीची पहिलीच हायब्रीड इंजिनवाली कार लॉन्च, वाचा मायलेज आणि किंमत
Share your comments