1. ऑटोमोबाईल

नादखुळा जुगाड! अवघ्या 45 हजार रुपयांमध्ये मारुती 800 बनली करोडो रुपयांची रोल्स रॉयल्स..

देसी जुगाडच्या बाबतीत भारतातील लोकांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामध्ये कोणीतरी अशी युक्ती समोर आणते की संपूर्ण जग हादरून जाते. सायकलचे मोटरसायकलमध्ये रूपांतर करणे असो किंवा स्वस्त कारचे लक्झरी कारमध्ये रूपांतर करणे असो... भारतीयांसाठी सर्व काही सोपे आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Maruti 800 became the Rolls Royals

Maruti 800 became the Rolls Royals

देसी जुगाडच्या बाबतीत भारतातील लोकांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यामध्ये कोणीतरी अशी युक्ती समोर आणते की संपूर्ण जग हादरून जाते. सायकलचे मोटरसायकलमध्ये रूपांतर करणे असो किंवा स्वस्त कारचे लक्झरी कारमध्ये रूपांतर करणे असो... भारतीयांसाठी सर्व काही सोपे आहे.

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने मारुती सुझुकी 800 चे करोडो रुपयांच्या रोल्स रॉयसमध्ये रूपांतर केले. केरळमधील तरुणाला रोल्स रॉयसची खूप आवड होती, पण त्याच्याकडे करोडो रुपयांची कार घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळेच त्यांनी जुगाड बनवण्याचा विचार केला.

यासाठी त्यांनी मारुती 800 चे रूपांतर करण्याची योजना आखली. तब्बल चार-पाच महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी पाच कोटी रुपयांची रोल्स रॉयससारखी चार लाखांची ही कार बनवली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व करण्यासाठी या तरुणाने केवळ 45 हजार रुपये खर्च केले. ट्रिक्स ट्यूब नावाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ सर्वप्रथम अपलोड करण्यात आला होता.

आजपासून साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही, ऊसदरासाठी आता राजू शेट्टी आक्रमक

ज्यामध्ये या तरुणाबद्दल माहिती देण्यात आली होती. या तरुणाने वाहिनीला सांगितले की, मला हे करण्याची आवड आहे, त्याने यापूर्वीही असे पराक्रम केले आहेत. बाईकच्या इंजिनपासून त्यांनी जीपही बनवली आहे. तो जुन्या वाहनांचे भाग घेतो, त्यांना एका वाहनात एकत्र करतो आणि स्वतः डिझाइन अंतिम करतो.

सध्या केरळमधील हा तरुण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच ही गाडी जिथून जात असेल तिथं लोक नक्कीच मागे वळून पाहतात. ही एवढी स्वस्त कार आहे हे पहिल्या दृष्टीक्षेपात कोणालाच समजत नाही. हा देसी जुगाड पाहून सोशल मीडिया यूजर्सही जोरदार कमेंट करत आहेत.

शेतकऱ्याचा नाद खुळा! चक्क ऑडीतून केली भाजीची विक्री, पब्लिक बघतच राहिले...

English Summary: Nadkhula Jugad! Maruti 800 became the Rolls Royals of crores of rupees in just 45 thousand rupees. Published on: 03 October 2023, 12:23 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters