कार निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मारुती सुझुकीने नवीन एसयुवी ग्रँड विटारा कारच्या किमतीची घोषणा केली असून मारुतीची पहिली हायब्रीड इंजिन असलेली कार आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे ही पेट्रोलवरील ही कार डिझेल कारपेक्षा जास्त मायलेज देणारी ठरणार आहे.
या कारमध्ये सनरूफ वैशिष्ट्ये देण्यात आले असून या कारला कंपनी सिग्मा, डेल्टा, झेटा+,अल्फा प्लस अशा पाच व्हेरिएंटमध्ये आणत आहे. या कंपनीचे बुकिंग आधीच सुरू झाले असून आतापर्यंत 55 हजारपेक्षा जास्त बुकिंग पूर्ण झाले आहेत.ही कार हायब्रीड तंत्रज्ञानावर आधारित आहे. या नवीन कारमध्ये दीड लिटर पेट्रोल इंजिन बसवण्यात आले असून हे इंजिन 115hp पावर आणि 141 Nm टॉर्क जनरेट करते.
नक्की वाचा:CNG Cars: सणासुदीच्या काळात खरेदी करा या स्वस्त सीएनजी; इंधनाचा खर्च होईल झटक्यात कमी
यासोबतच हायब्रीड वर चालवल्यास हायब्रीड इंजिन ताकदीला थोडे कमी असून ते 103 hp पावर आणि 135 Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ व्यतिरिक्त 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला असून
ही कार जपानच्या दोन्ही कंपन्या टोयोटा मोटर कॉर्पोरेशन आणि सुझुकी मोटर कार्पोरेशन यांनी एकत्रित डेव्हलप केली आहे. याशिवाय थ्री पॉड डीआरएल युनिट, स्ट्रेचड एलईडी बार इत्यादी वैशिष्ट्य देण्यात आले आहे. या कार मध्ये नवीन टच स्क्रीन इन्फॉटेनमेंट सिस्टम, हेडअप डिस्प्लेसह देण्यात आली आहे.
या कारची किंमत
या कारची एक्स शोरूम किंमत साडे दहा लाख रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली असून या कार मधील टॉप एसयुवीचे मॉडेल 19 लाख 65 हजार रुपयांपर्यंत जाते.
Share your comments