मारुती कंपनी ही कार निर्मिती क्षेत्रातील हा भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे कार मॉडेल सगळ्यांच्या पसंतीचे आहेत. परंतु कारच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा विचार केला तर जास्त करून महिंद्रा आणि मारुतीच्या कार जास्त करून वापरतात. यामध्ये खास करून मारुतीची स्विफ्ट ही कार बऱ्याच शेतकऱ्यांच्या पसंतीची आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मारुती कंपनीने सर्वात लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्ट चे सीएनजी मॉडेल लॉन्च केले आहे. ही कार आता Vxi आणि Zxi या दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आली असून या स्विफ्ट एस सीएनजी कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7 लाख 77 हजार रुपयांपासून सुरू होते.
नक्की वाचा:प्रतीक्षा संपली! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या खासियत..
या कारची वैशिष्ट्ये
मारुती स्विफ्ट एस सीएनजी कार मध्ये 1.2 LK सिरीज डुएल जेट, डुएल VVT इंजिन असून ते 77.49 PS पावर आणि 98.5 नम टॉर्क जनरेट करते. या कारचे इंजिन 5 स्पीड गिअर बॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीने या कारच्या मायलेजच्या बाबतीत दावा केला आहे की मी कारचे मायलेज 30.90 किमी/ किलो आहे.
या कारचे डिझाइनमध्ये कुठलाही बदल करण्यात आला नसून त्याच्या फिचरमध्ये फारसे बदल करण्यात आलेले नाही.यामध्ये अँटी लॉक ब्रकिंग सिस्टम, एअर बॅग, रिव्हर्स पार्किंग सेंसर, रियर कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट इत्यादी वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.
या कारच्या Zxi व्हेरीअन्टची एक्स शोरूम किंमत आठ लाख 45 हजार रुपये आहे. तर Vxi व्हेरिएंटची किंमत सात लाख 77 हजार रुपये आहे.
Share your comments